राहुल गांधी यांची पत्रकार परिषद (फोटो- टीम नवराष्ट्र)
नवी दिल्ली: भारताचे दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यावर अमेरिकेतील एका कंपनीने फसवणूक आणि लाचखोरीचा गुन्हा दाखल केला आहे. कंत्राट मिळवण्यासाठी 250 दशलक्ष डॉलर्सची लाच दिल्याचा आणि प्रकरण लपवल्याचा आरोप आहे. भारतातील दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. यावर आता विरोधी पक्षनेते आणि कॉँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर भाष्य केले आहे. गौतम अदानी हे भारतातील एक लोकप्रिय उद्योगपती आहेत. दरम्यान विरोधी पक्ष त्यांच्यावर कायमच भाजपवर टीका करताना दिसून येतो.
राहुल गांधी गौतम अदानी यांच्याबाबत दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उद्योगपती गौतम अदानी यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली आहे. गौतम अदानी प्रकरणावर आम्ही शांत बसणार नाही. हा मुद्दा आम्ही संसदेत देखील मांडणार आहोत. भाजपचे सरकार अदानी यांना वाचवेल हे आम्हाला माहिती आहे.
“जोपर्यंत नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी एकत्रित आहेत तोवर ते सुरक्षित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गौतम अदानी यांच्या पाठीशी आहेत, त्यामुळे सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही. ते त्यांचे पूर्णपणे संरक्षण करणार आहेत. गौतम अदानी जेलमध्ये गेले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील जेलमध्ये जातील. भाजपचा निधी त्यांच्याशी जोडलेला आहे,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
हेही वाचा: अमेरिकेत चांगलेच अडकले गौतम अदानी; फसवणूक आणि लाचखोरीचे गुन्हे दाखल
गौतम अदानी यांच्यावर गुन्हा दाखल
न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 62 वर्षीय गौतम अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांच्यावर असे आरोप निश्चित होणे हा त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे. गौतम अदानी यांचे व्यावसायिक साम्राज्य बंदरे आणि विमानतळांपासून ऊर्जा क्षेत्रापर्यंत पसरले आहे. अदानी आणि त्यांच्या कंपनीच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या अक्षय ऊर्जा कंपनीसाठी कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना पैसे देण्याचे मान्य केल्याचा आरोप अमेरिकन वकिलांनी केला आहे. या करारातून कंपनीला येत्या 20 वर्षांत दोन अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नफा मिळण्याची अपेक्षा होती.
मोदी जी अडानी को कभी अरेस्ट नहीं करेंगे। क्योंकि अंत में वही फंसेंगे।
इसलिए – एक हैं तो Safe हैं! pic.twitter.com/Qj8B4iselg
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 21, 2024
तक्रारदार ॲटर्नी ब्रायन पीस
यूएस ऍटर्नी ब्रायन पीस यांनी आरोपपत्रात म्हटले आहे की, प्रतिवादींनी अब्जावधी डॉलर्सचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्याची गुप्त योजना आखली होती. लाचखोरी योजनेबाबत खोटे बोलले. कारण ते अमेरिकन आणि जागतिक गुंतवणूकदारांकडून भांडवल उभारण्याचा प्रयत्न करत होते. ब्रायन पीस म्हणाले की, माझे कार्यालय आंतरराष्ट्रीय बाजारातून भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कटिबद्ध आहे. आमच्या वित्तीय बाजारांच्या विश्वासार्हतेच्या खर्चावर स्वतःला समृद्ध करू पाहणाऱ्यांपासून ते गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करते.