Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्रिजभूषण सिंह यांच्या निषेधार्थ विनेश फोगट मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करणार, पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र

पीएम मोदींना लिहिलेल्या पत्रात विनेश फोगटने म्हटले आहे की, साक्षी मलिकने कुस्ती सोडली आहे आणि बजरंग पुनियाने त्यांचे पद्मश्री परत केले आहे. मी ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करत आहे.

  • By Aparna
Updated On: Dec 26, 2023 | 09:30 PM
ब्रिजभूषण सिंह यांच्या निषेधार्थ विनेश फोगट मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करणार, पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र
Follow Us
Close
Follow Us:

भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात दिग्गज कुस्तीपटूंनी विरोध सुरूच ठेवला आहे. दरम्यान, विनेश फोगटने तिचा पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे.

फोगट हिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून मी माझा मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करत आहे. मला या परिस्थितीत आणल्याबद्दल सर्वशक्तिमानाचे खूप आभार. हे पत्र तिने सोशल मीडिया X वर शेअर केले आहे.

 

मैं अपना मेजर ध्यानचंद खेल रत्न और अर्जुन अवार्ड वापस कर रही हूँ।

इस हालत में पहुँचाने के लिए ताकतवर का बहुत बहुत धन्यवाद ? pic.twitter.com/KlhJzDPu9D

— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) December 26, 2023

विनेश फोगटच्या निर्णयावर सहकारी कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला की, तो या निर्णयाने अवाक आहे. कोणत्याही खेळाडूला हा दिवस पाहावा लागू नये. बजरंग पुनियानेही पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी साक्षी मलिकने कुस्ती सोडण्याची घोषणा केली होती.

विनेश फोगटने काय लिहिले?
विनेश फोगटने लिहिले, “माननीय पंतप्रधान, साक्षी मलिकने कुस्ती सोडली आहे आणि बजरंग पुनियाने त्यांचे पद्मश्री परत केले आहे. तुम्ही देशाचे प्रमुख आहात त्यामुळे ही बाब तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. मी विनेश फोगट, तुमच्या देशाची मुलगी आहे आणि गेल्या एक वर्षापासून माझी काय स्थिती आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हे पत्र लिहित आहे.

फोगटने पुढे लिहिले की, मला आठवते की 2016 मध्ये साक्षी मलिकने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते, तेव्हा तुमच्या सरकारने तिला बेटी बचाओ बेटी पढाओची ब्रँड अॅम्बेसेडर बनवले होते. जेव्हा ही घोषणा झाली तेव्हा देशातील सर्व महिला खेळाडू आनंदात होत्या आणि एकमेकांना अभिनंदनाचे संदेश पाठवत होत्या. आज जेव्हा साक्षीला कुस्ती सोडावी लागली तेव्हा मला 2016 पुन्हा पुन्हा आठवतोय.

आत्तापर्यंत काय घडले?
गुरुवारी (21 डिसेंबर) भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या अगदी जवळचे संजय सिंह यांनी WFI अध्यक्षपदासाठी निवडणूक जिंकली होती. याच्या निषेधार्थ शुक्रवारी (२२ डिसेंबर) बजरंग पुनिया यांनी पीएम मोदींना पत्र लिहून पद्मश्री परत करण्याची घोषणा केली होती.

पुनिया यांनी पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी आणि त्यांना पत्र सुपूर्द करण्यासाठी संसदेत पोहोचण्याचा प्रयत्न केला तेव्हा दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवले. यानंतर त्यांनी पद्मश्री पदपथावर सोडली.

रिओ ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती साक्षी मलिकने गुरुवारी टेबलावर शूज ठेवून भावनिकरित्या निवृत्तीची घोषणा केली आणि ती म्हणाली, “आम्ही मनापासून लढलो, परंतु ब्रिजभूषण सिंग यांचा जवळचा सहकारी WFI च्या अध्यक्षपदी निवडून आला, तर मी कुस्ती सोडली. ”

तथापि, अंडर-15 आणि अंडर-20 राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्याच्या घाईघाईने घोषणा केल्याच्या आरोपानंतर, क्रीडा मंत्रालयाने रविवारी (24 डिसेंबर) WFI अनिश्चित काळासाठी निलंबित केले होते.

Web Title: Vinesh phogat to return major dhyan chand khel ratna and arjuna award over brijbhushan singhs protest letter to pm modi nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2023 | 09:30 PM

Topics:  

  • Vinesh phogat
  • Wrestler

संबंधित बातम्या

Vinesh Phogat become Mother: विनेश फोगाटच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
1

Vinesh Phogat become Mother: विनेश फोगाटच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

ब्रिजभूषण शरण सिंग यांना मोठा दिलासा! न्यायालयाने POCSO खटला केला बंद, वाचा सविस्तर
2

ब्रिजभूषण शरण सिंग यांना मोठा दिलासा! न्यायालयाने POCSO खटला केला बंद, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.