
Vishva Hindu Parishad Members Protest outside the Bangladesh High Commission in India
नवी दिल्लीमधील बांगलादेशी उच्चायुक्तालयाबाहेर हिंदू तरुण आक्रमक झाले आहेत. बांगलादेशातील हिंदूंसाठी भारतामध्ये आवाज उठवला जात आहे. विश्व हिंदू परिषद (VHP) २३ डिसेंबर २०२५ रोजी दिल्लीत निदर्शने केली जात आहेत. बांगलादेशमध्ये अलिकडेच झालेल्या हिंदू तरुण दीपू चंद्राच्या हत्येमुळे दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर तणाव निर्माण झाला आहे. निदर्शकांनी बांगलादेश उच्चायुक्तालयासमोरील बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न केला. आक्रमक तरुणांची दिल्ली पोलिसांशी झटापट देखील झाली.
हे देखील वाचा : दोन दशकानंतर महाराष्ट्राचे स्वप्न अखेर पूर्ण होणार! उद्या 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा
आज (दि.23) सकाळी ११ वाजल्यापासून, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते बांगलादेशमधील हिंदू पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर जमले आहेत. दरम्यान, बांगलादेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या, विशेषतः वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढत आहे.
युनूस सरकारकडून भारतीय उच्चायुक्तांना आमंत्रण
मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या काही वेळ आधी बांगलादेशातील भारताचे उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावण्यात आले. या बैठकीला भारताचे उपउच्चायुक्तही उपस्थित होते. बांगलादेशचे परराष्ट्र सचिव असद अल-सियाम यांनी उच्चायुक्तांना बोलावले. मिळालेल्या वृत्तानुसार, भारतातील विविध भागातील बांगलादेश मिशनभोवती वाढत्या सुरक्षा चिंतेमुळे वर्मा यांना बोलावण्यात आले. त्यांना भारतातील सर्व बांगलादेश मिशनची सुरक्षा अधिक मजबूत करण्याची विनंती करण्यात आली.
#WATCH | Delhi | Protest by members of Vishva Hindu Parishad and other Hindu organisations continues near the Bangladesh High Commission over the atrocities against Hindus and the mob lynching of Dipu Chandra Das in Bangladesh A protester says,” Hindus are being killed there.” pic.twitter.com/pZ8RYdPpYB — ANI (@ANI) December 23, 2025
यापूर्वी, वर्मा यांना १४ डिसेंबर रोजी बोलावण्यात आले होते. त्यावेळी बांगलादेशने माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सततच्या चिथावणीखोर विधानांवर चिंता व्यक्त केली आणि इन्कलाब मंचचे प्रवक्ते शरीफ उस्मान हादी यांच्या मारेकऱ्याला भारतात पळून जाण्यापासून रोखण्यासाठी भारताचे सहकार्य मागितले. बांगलादेशने असेही म्हटले आहे की जर आरोपी भारतीय हद्दीत घुसला तर त्याला ताबडतोब अटक करून बांगलादेशला सोपवण्यात यावे.
दोन दिवसांपूर्वी दिल्लीतही निषेध
शनिवारी रात्री (२० डिसेंबर) बांगलादेशात एका हिंदू तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले की हा निषेध मर्यादित आणि शांततापूर्ण होता. त्यांनी सांगितले की बांगलादेश उच्चायुक्तालयाच्या सुरक्षेला कोणताही धोका नव्हता आणि निषेधात फक्त २० ते २५ तरुण सहभागी होते.
हे देखील वाचा : चहापानला 2 कोटी तर स्टेजसाठी 5 कोटी..! प्रचार सभांसाठी भाजपचा आदिवासी फंडावर डल्ला? AAP चा आरोप
बांगलादेशमध्येही दीपूला न्याय मिळण्याची मागणी
२२ डिसेंबर २०२५ रोजी, बांगलादेशमध्ये दीपूच्या हत्येच्या निषेधार्थ हिंदू संघटना आणि अल्पसंख्याक गटांनी ढाका येथील राष्ट्रीय प्रेस क्लबसमोर निदर्शने केली. निदर्शकांनी सांगितले की दीपू निर्दोष होता आणि त्याच्यावर ईशनिंदेचा खोटा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर, कट्टरपंथीयांनी त्याच्यावर हिंसाचार केला आणि त्याची हत्या करण्यात आली.
निदर्शकांनी आरोप केला की बांगलादेशातील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. त्यांचा दावा आहे की या वर्षी जानेवारीपासून ५० हून अधिक गैर-मुस्लिम मारले गेले आहेत आणि अनेकांवर ईशनिंदेच्या खोट्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.