Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिहारच्या मतदार यादीत 18 लाख मृत, 26 लाख स्थलांतरित आणि 7 लाख दुहेरी नोंदणी असलेले मतदार

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाचे जेडीयू खासदार गिरधारी यादव यांनी बिहारमधील मतदार यादी पुनरावृत्ती (एसआयआर) वर आक्षेप घेतला आहे. तर दुसरीकडे बिहारच्या मतदार यादीत 18 लाख मृत व्यक्ती आढळले आहेत.  

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 23, 2025 | 06:33 PM
बिहारच्या मतदार यादीत 18 लाख मृत, 26 लाख स्थलांतरित आणि 7 लाख दुहेरी नोंदणी असलेले मतदार

बिहारच्या मतदार यादीत 18 लाख मृत, 26 लाख स्थलांतरित आणि 7 लाख दुहेरी नोंदणी असलेले मतदार

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादी पुनरावृत्तीवरून बराच गोंधळ सुरू आहे. आता मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडच्या खासदारांनी निवडणूक आयोगाच्या या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. बांका येथील जेडीयूचे खासदार गिरधारी यादव यांनी बुधवारी आरोप केला की आयोगाने कोणतेही व्यावहारिक ज्ञान नसताना जबरदस्तीने मतदार सघन पुनरावृत्ती आमच्यावर लादली आहे. आपला अनुभव सांगताना त्यांनी मतदार यादी पुनरावृत्तीच्या वेळेच्या मर्यादेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि या प्रक्रियेसाठी किमान ६ महिने दिले पाहिजेत असे सांगितले.

Parliament Monsoon Session 2025: संसदेचा तिसरा दिवसही वादळी; SIRवरून विरोधक आक्रमक

मतदार यादीत 18 लाख मृत

तर दुसरीकडे भारत निवडणूक आयोगाच्यावतीने बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरावलोकनात (Special Intensive Revision – SIR) आतापर्यंत सुमारे 18.66 लाख मतदार मृत, 26.01 लाख अन्य मतदार स्थलांतरित झालेले असून, 7.5 लाख मतदारांची नोंदणी दोन ठिकाणी आढळली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने जोरदार मोहीम हाती घेतली असून, येत्या 1 ऑगस्ट 2025 रोजी प्रारूप मतदार यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 1 लाख बीएलओ (BLO), 4 लाख स्वयंसेवक आणि 12 प्रमुख राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी नियुक्त केलेले 1.5 लाख बीएलए (BLA) कार्यरत आहेत.

एकूण मतदार (२४ जून २०२५ रोजीपर्यंत): ७,८९,६९,८४४

प्राप्त गणनापत्रक (Enumeration Forms): ७,१६,०४,१०२ (९०.६७%)

डिजिटायझ्ड गणनापत्रक: ७,१३,६५,४६० (९०.३७%)

पत्त्यावर न सापडलेले मतदार: ५२,३०,१२६ (६.६२%)

मृत मतदार: १८,६६,८६९ (२.३६%)

कायमचे स्थलांतरित: २६,०१,०३१ (३.२९%)

दुहेरी नोंदणी: ७,५०,७४२ (०.९५%)

न सापडणारे: ११,४८४ (०.०१%)

एकूण कव्हर झालेले मतदार : ७,६८,३४,२२८ (९७.३०%)

अद्याप प्राप्त न झालेले गणनापत्रक: २१,३५,६१६ (२.७०%)

याबाबत 1 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांना प्रारूप मतदार यादीबाबत अधिकाऱ्यांकडे हरकती, दुरुस्ती, समावेश किंवा वगळण्याबाबत अर्ज करता येणार आहे, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

अंतिम यादी ३० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध

एसआयआरमधून कोणताही मतदार वगळला जाऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने अनेक पावले उचलली आहेत. ज्या मतदारांची नावे मृत, हस्तांतरित किंवा दुहेरी नोंदणी म्हणून चिन्हांकित केली गेली आहेत त्यांची यादी राजकीय पक्ष आणि त्यांच्या बूथ लेव्हल एजंट्सना शेअर करण्यात आली आहे. २५ जुलैपर्यंत या मतदारांची स्थिती निश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

याशिवाय, १ ऑगस्ट रोजी प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर, १ सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी वेळ देण्यात येईल. त्यानंतर, ३० सप्टेंबर २०२५ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

Vice President Election: जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानतंर कोण होणार देशाचे नवे उपराष्ट्रपती? या नावांची चर्चा

Web Title: Voter list of bihar there are 18 million deceased voters 26 million migrants and 700000 voters with double registration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 06:33 PM

Topics:  

  • bihar
  • Election
  • Election Commission

संबंधित बातम्या

Bihar Election 2025 : १०० रुपये परीक्षा शुल्क, उद्योगांना अनुदान; गांधी मैदानातून नितीश कुमार यांच्या ४ मोठ्या घोषणा
1

Bihar Election 2025 : १०० रुपये परीक्षा शुल्क, उद्योगांना अनुदान; गांधी मैदानातून नितीश कुमार यांच्या ४ मोठ्या घोषणा

Sonia Gandhi: भाजपचा पलटवार! नागरिकत्व मिळण्यापूर्वीच सोनिया गांधीचं मतदार यादीत नाव, ‘४५ वर्षे जुना कागदपत्र प्रसिद्ध’
2

Sonia Gandhi: भाजपचा पलटवार! नागरिकत्व मिळण्यापूर्वीच सोनिया गांधीचं मतदार यादीत नाव, ‘४५ वर्षे जुना कागदपत्र प्रसिद्ध’

बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांचे दोन ओळखपत्रं,आयोगाचा अजब कारभार
3

बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांचे दोन ओळखपत्रं,आयोगाचा अजब कारभार

प्रतिज्ञापत्रावर सही करा किंवा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना पु्न्हा इशारा
4

प्रतिज्ञापत्रावर सही करा किंवा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना पु्न्हा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.