Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tejashwi Yadav : पराभवाच्या भीतीने मतदार यादीत घोळ घालण्याचं कारस्थान; तेजस्वी यादव यांचा मोदी, नितीश कुमारांवर गंभीर आरोप

बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांचे वातावरण तापू लागलं आहे. या वातावरणात विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केंद्र सरकार आणि बिहार सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 27, 2025 | 09:41 PM
पराभवाच्या भीतीने मतदार यादीत घोळ घालण्याचं कारस्थान; तेजस्वी यादव यांचा मोदी, नितीश कुमारांवर गंभीर आरोप

पराभवाच्या भीतीने मतदार यादीत घोळ घालण्याचं कारस्थान; तेजस्वी यादव यांचा मोदी, नितीश कुमारांवर गंभीर आरोप

Follow Us
Close
Follow Us:

बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांचे वातावरण तापू लागलं आहे. या वातावरणात विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि बिहार सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक आयोगाने सुरू केलेला नव्या मतदार यादी रिव्हिजन कार्यक्रम, एका नियोजित कटाचा भाग आहे. गरिबांना आणि वंचितांना मतदानापासून दूर ठेवण्यासाठी हा घाट घातल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Bihar CM : बिहार निवडणुकीत महाआघाडी जिंकली तर कोण होणार CM? कॉंग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार यांनी थेट नावच जाहीर केलं

एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत तेजस्वी यादव म्हणाले की, सध्या बिहारमध्ये अनेक भागांत पुराची स्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी मतदार यादीत नव्याने फेरफार करणे म्हणजे निव्वळ एक अव्यवहार्य आणि संशयास्पद पाऊल आहे. भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांना निवडणुकीत पराभवाची भीती वाटत आहे, म्हणूनच मतदार यादीत छुप्या मार्गाने छेडछाड करून मतांचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

नव्या मतदार यादीसाठी नवी कागदपत्रे मागवली जात आहेत. त्यामध्ये पालकांचे जन्म प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्र बहुतांश गरीब आणि मागासवर्गीय लोकांकडे नाहीत. त्यामुळे सर्वप्रथम त्यांचे मतदानाचे हक्क हिरावले जातील, त्यानंतर त्यांचा रेशन आणि पेन्शन सुद्धा बंद केला जाईल,” असा दावा त्यांनी केला आहे.

मतदार यादीत छेडछाड करण्याचा हा सर्व कट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशावरून रचण्यात आला. मतदार यादीत फेरफार करण्यासाठीच नितीश कुमार यांनी यांनी केंद्र सरकारकडून दबाव आणला.  त्यासाठीच नितीश कुमारांच्या सतत दिल्ली वारी होत असतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर RJD याला विरोध करणार असून गरज भासल्यास न्यायालयातही हा विषय नेला जाईल. तसंच, इंडिया आघाडीतील नेते लवकरच दिल्लीतील निवडणूक आयोगाची भेट घेऊन आपला विरोध नोंदवणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

Bihar Opinion Poll : या क्षणाला निवडणुका झाल्या तर बिहारवर कोणाची सत्ता? ओपिनियन पोलनी दिला कौल

मुलाखतीदरम्यान चिराग पासवान यांच्याविषयी विचारले असता, तेजस्वी यादव म्हणाले की, ते निवडणुकीच्या मैदानात उतरण्याने फारसा फरक पडणार नाही. केंद्रीय मंत्री असताना चिराग पासवान यांनी बिहारसाठी नेमके काय केले आहे हे दाखवून द्यावं?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. बिहारची जनता आता जागरूक झाली आहे. लोकशाहीच्या हत्येचा प्रयत्न करणारं कोणत्याही कारस्थान यशस्वी होणार नाही. RJD आणि संपूर्ण विरोधक या प्रकाराविरोधात एकजूट होऊन लढा देतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Web Title: Voter list revision it is bjp and nitish kumar conspiracy tejashwi yadav allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 09:31 PM

Topics:  

  • Bihar Election
  • Nitish Kumar
  • Tejaswi Yadav

संबंधित बातम्या

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?
1

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Politics: नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर; बड्या नेत्याची खुर्ची धोक्यात
2

Bihar Politics: नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर; बड्या नेत्याची खुर्ची धोक्यात

Bihar Politics: रोहिणी आचार्य यांच्यापाठोपाठ लालू प्रसाद यादव यांच्या तिन्ही मुलींनी सोडले राबडी निवास
3

Bihar Politics: रोहिणी आचार्य यांच्यापाठोपाठ लालू प्रसाद यादव यांच्या तिन्ही मुलींनी सोडले राबडी निवास

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana Bihar: 10 हजार रुपयांच्या योजनेमुळे बदलले बिहारचे राजकीय गणित? नितीश कुमारांची गेम-चेंजर योजना!
4

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana Bihar: 10 हजार रुपयांच्या योजनेमुळे बदलले बिहारचे राजकीय गणित? नितीश कुमारांची गेम-चेंजर योजना!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.