मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या (President) खुर्चीवर कोण विराजमान होणार, याबाबत देशातच नव्हे तर जगभरात उत्सूकता लागली आहे. यासाठी एनडीएच्या (NDA) उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आणि विरोधी गटाकडून यशवंत सिन्हा (Yashwant Sinha), हे यांच्यात लढत होणार आहे. त्यासाठी आज मतदान (Today Voting) होत आहे.
राष्ट्रपती पदासाठी भाजपने द्रौपदी मुर्मू यांच्या रुपात आदिवासी (Tribal) चेहरा दिला असून आज मतदान झाल्यानंतर २१ जुलै रोजी निकाल लागणार आहे. त्यानंतर २५ जुलै रोजा नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी (Swearing) होईल.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र सरकारमधील (Government Of Maharashtra) शिंदे गट आणि भाजपच्या (BJP) आमदारांचा मुक्काम मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये (Hotel Trident) आहे. तर, राष्ट्रवादीच्या (NCP) आमदारांना मार्गदर्शन करण्यासाठी सकाळी ९ वाजता विधान भवनात बैठक बोलावण्यात आली आहे. यावेळी, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड असल्याचे दिसते.