Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशात दोन विचारधारांची लढाई, काँग्रेसची विचारधारा संविधानवादी तर भाजपची…; हर्षवर्धन सपकाळांची टीका

चिपळूण येथे सुरु असलेल्या काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरात दुसऱ्या दिवशी मार्गदर्शन करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दोन विचारधारांमधील फरक स्पष्ट करुन सांगितला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 28, 2026 | 04:31 PM
देशात दोन विचारधारांची लढाई, काँग्रेसची विचारधारा संविधानवादी तर भाजपची...; हर्षवर्धन सपकाळांची टीका

देशात दोन विचारधारांची लढाई, काँग्रेसची विचारधारा संविधानवादी तर भाजपची...; हर्षवर्धन सपकाळांची टीका

Follow Us
Follow Us:

चिपळूण : देशात दोन विचारधारांची लढाई आहे, एक विचारधारा काँग्रेसची आहे तर दुसरी भाजपाची. काँग्रेस व भाजपाच्या स्वप्नातील भारत वेगळा आहे. संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, तर हा देश फक्त मूठभर लोकांचा असावा, स्त्री-पुरुष समानता न मानणारा, स्पृश्य-अस्पृश्यता माननारा मनुवादी विचार भाजपाचा आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

 

चिपळूण येथे सुरु असलेल्या काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरात दुसऱ्या दिवशी मार्गदर्शन करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दोन विचारधारांमधील फरक स्पष्ट करुन सांगितला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजपाला सत्ता, संपत्ती हवी आहे, सर्व यंत्रणांवर कब्जा हवा आहे. हिंसा, द्वेष, भय पसरवणे, असत्य कथन करणे व देश हा मुठभर लोकांच्या हाती असावा, अशी त्यांची संकल्पना असून आज त्याच पद्धतीचे वातावरण भारतात आहे. निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय, न्यायपालिका, सरकारी यंत्रणा अशा सर्व संस्थांवर भाजपाने कब्जा केला असून देशभर त्यांनी थैमान घातले आहे.

भाजपा मनुस्मृती व ‘बंच ऑफ थॉट’ला अभिप्रेत भारत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे पण याच्या उलट काँग्रेसची विचारधारा आहे. हा देश सर्वांचा आहे, देशातील संपत्तीवर सर्व लोकांचा अधिकार आहे, सत्तेचे विकेंद्रीकरण हा काँग्रेसचा विचार आहे. संविधानानुसार देश चालला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे आणि या संविधानात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचे, शिव, शाहु, फुले, आंबेडकर, संत, वारकरी संप्रदाय, बसवेश्वर महाराज यांचे विचार आहेत.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात पंडित जवारलाल नेहरु यांनी सहा बिगर काँग्रेसी नेत्यांना स्थान दिले होते. यामागे सर्व विचारधारांना सहभागी करुन घेणे हा विचार होता. पंतप्रधान पंडित नेहरुंची कॉलर एका सामान्य महिलेनी पकडून ‘स्वातंत्र्याने मला काय दिले’? अशी विचारणा केली, त्यावेळी नेहरुंनी त्या महिलेला अटक केली नाही उलट तिच्या प्रश्नाला शांतपणे उत्तर दिले. आजच्या भारतात अशी हिम्मत कोणी करु शकत नाही. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले तर त्यांना अटक करुन देशद्रोही असल्याचा अपप्रचार केला जात आहे. आज सरकारच्या विरोधात कोणी बोलू शकत नाही, अशी भयानक परिस्थिती देशात आहे.

काँग्रेसला संपवण्याचे अनेक प्रयत्न झाले पण काँग्रेस संपणार नाही. काँग्रेस पक्षाला मोठा वारसा लाभलेला आहे. ज्यांनी काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पाहिले तेच काँग्रेसयुक्त झाले आहेत. आपले नेते राहुल गांधी यांनी आपल्याला ‘डरो मत’चा संदेश दिला आहे. कोणत्याही दबावाला, दहशतीला न घाबरता विचारांची लढाई लढा आणि जो लढेल तोच जिंकेल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा : काँग्रेस हाच भाजपला सक्षम पर्याय, 2029 साली देशात काँग्रेसची सत्ता येणार; हर्षवर्धन सपकाळांचा विश्वास

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has criticized bjp in chiplun

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का! आदित्य फत्तेपूरकरांचा उमेदवारी अर्ज बाद
1

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का! आदित्य फत्तेपूरकरांचा उमेदवारी अर्ज बाद

कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी दिलासा की आणखी एक जुमला? हर्षवर्धन सकपाळ यांचे मोठे वक्तव्य
2

कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी दिलासा की आणखी एक जुमला? हर्षवर्धन सकपाळ यांचे मोठे वक्तव्य

NEET आणि CBSE परीक्षांमधील पेपरफुटी आणि घोटाळ्यांच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचा “युवा आक्रोश मोर्चा”
3

NEET आणि CBSE परीक्षांमधील पेपरफुटी आणि घोटाळ्यांच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचा “युवा आक्रोश मोर्चा”

Maharashtra Political: महायुतीमध्ये वाढती दरी! फडणवीसांच्या बैठकीला शिंदे अनुपस्थित; जागावाटपाचा वाद चिघळला
4

Maharashtra Political: महायुतीमध्ये वाढती दरी! फडणवीसांच्या बैठकीला शिंदे अनुपस्थित; जागावाटपाचा वाद चिघळला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.