Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘वक्फ’ची एक इंचही जमीन सोडणार नाही’ ; ओवेसींचा लोकसभेत इशारा

वक्फ संशोधन विधेयकावरून राजकीय हालचाल वाढली आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन प्रमुख आणि हैदराबादेतील खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी या विधेयकाचा जोरदार विरोध केला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 06, 2025 | 12:07 AM
'वक्फ'ची एक इंचही जमीन सोडणार नाही' ; ओवेसींचा लोकसभेत इशारा

'वक्फ'ची एक इंचही जमीन सोडणार नाही' ; ओवेसींचा लोकसभेत इशारा

Follow Us
Close
Follow Us:

वक्फ संशोधन विधेयकावरून राजकीय हालचाल वाढली आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन प्रमुख आणि हैदराबादेतील खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी या विधेयकाचा जोरदार विरोध केला आहे. त्यांनी सरकारला स्पष्टपणे इशारा देत म्हटले की, जर हे विधेयक आपल्या सद्य स्वरुपात पारित झाले, तर यामुळे देशात सामाजिक अस्थिरता निर्माण होईल. ओवेसींचे म्हणणे आहे की, हे विधेयक घटनेच्या कलम 25, 26 आणि 14चे उल्लंघन करत आहे, जे धार्मिक स्वातंत्र्य आणि समानतेची हमी देते.

लोकसभेत आपल्या संबोधनात ओवेसींनी आक्रमक भूमिका घेत म्हटले की, मी सरकारला सावध करत आहे आणि इशारा देत आहे की, जर तुम्ही हे विधेयक आहे त्या स्वरुपात पास केले, तर याचे गंभीर परिणाम होतील. हे मुस्लिम समुदायाच्या संविधानिक अधिकारांचे उल्लंघन करते आणि आम्ही आमच्या वक्फ मालमत्तेची एक इंचही जागा सोडणार नाही. तसेच ओवेसींनी हेही म्हटले की, हे विधेयक देशाला मागे ढकलण्याचा प्रयत्न आहे आणि याने समाजात असंतोष पसरेल.

या विधेयकावरून विरोधी पक्षांनी देखील सरकारवर आरोप केल आहे. काँग्रेस तृणमूल काँग्रेस, डीएमके आणि एमआयएम यासह अनेक पक्षांनी आरोप केला आहे की, सरकार या विधेयकाच्या माध्यमातून वक्फ बोर्डाची स्वायत्तता नष्ट करू इच्छिते. त्यांचे म्हणणे आहे की, हे विधेयक म्हणजे मुस्लिम समाजाच्या धार्मिक आणि सामाजिक संरचनेस कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे.

संयुक्त संसदीय समितीने या विधेयकाच्या मसुद्यास मंजुरी दिली आहे. समितीच्या बैठकीत भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने प्रस्तावित 14 दुरुस्त्यांना बहुमताने पारीत केले. जेपीसी अध्यक्षा जगदंबिका पाल यांनी म्हटले की, 16 सदस्यांनी या दुरस्त्यांचे समर्थन केले, तर दहा जणांनी विरोध केला आहे.

ओवेसींनी संसदेतील आपल्या भाषणात म्हटले की, सरकारला हे ठरवावे लागेल की त्यांना देशाला पुढे न्यायचे आहे की 80-90 च्या दशकात परत ढकलायचे आहे. आम्हाला पण हवं आहे की, भारत विकसित राष्ट्र बनावा, पण वक्फ मालमत्तांबाबत अशाप्रकारे वाद निर्माण करून देश पुढे जाईल का? सरकारला आपल्या प्राथमिकता ठरवाव्या लागतील.

Web Title: We will not give even an inch of waqf boards land asaduddin owaisi said in budget session

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2025 | 12:07 AM

Topics:  

  • Budget Session
  • Waqf Board Amendment Bill

संबंधित बातम्या

Waqf Amendment Act SC Hearing : मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक तुर्तास स्थगिती
1

Waqf Amendment Act SC Hearing : मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक तुर्तास स्थगिती

Supreme Court: मुस्लिमांना हिंदू धर्माच्या संस्थेवर संधी मिळले का? सुप्रीम कोर्टाचा केंद्राला सवाल
2

Supreme Court: मुस्लिमांना हिंदू धर्माच्या संस्थेवर संधी मिळले का? सुप्रीम कोर्टाचा केंद्राला सवाल

Waqf Amendment Bill : वक्फ सुधारणा विधेयक पश्चिम बंगालमध्ये लागू होणार नाही…; ममता बॅनर्जींचे ठाम मत
3

Waqf Amendment Bill : वक्फ सुधारणा विधेयक पश्चिम बंगालमध्ये लागू होणार नाही…; ममता बॅनर्जींचे ठाम मत

सरकारने वफ्फ विधेयक कायद्यात बदल केल्यानंतर हा आरडाओरड कशाला? भाजपचे माजी मुख्य प्रवक्ते यांचा विरोधकांना सवाल
4

सरकारने वफ्फ विधेयक कायद्यात बदल केल्यानंतर हा आरडाओरड कशाला? भाजपचे माजी मुख्य प्रवक्ते यांचा विरोधकांना सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.