Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

”ऑपरेशन सिंदूर’ मागे राजकीय डाव, नाव जाणिवपूर्वक दिलं!’; ममता बॅनर्जींनी थेट मोदींना दिलं लाईव्ह चर्चेचं आव्हान

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव मुद्दाम राजकीय फायदा मिळवण्यासाठी दिल्याचा आरोप केला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: May 29, 2025 | 05:30 PM
''ऑपरेशन सिंदूर' मागे राजकीय डाव, नाव जाणिवपूर्वक दिलं!'; PM मोदींवर टीका करत ममता बॅनर्जींनी दिलं लाईव्ह चर्चेचं खुलं आव्हान

''ऑपरेशन सिंदूर' मागे राजकीय डाव, नाव जाणिवपूर्वक दिलं!'; PM मोदींवर टीका करत ममता बॅनर्जींनी दिलं लाईव्ह चर्चेचं खुलं आव्हान

Follow Us
Close
Follow Us:

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव मुद्दाम राजकीय फायदा मिळवण्यासाठी दिलं आहे. सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन देशहितासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर आवाज उठवत आहेत, पण केंद्र सरकार मात्र राजकीय खेळी करत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

PM Modi Speech : ‘मुर्शिदाबादमध्ये जे घडलं ते अतिशय क्लेशदायक, TMC च्या लोकांनी घरांनाही…’, PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं की, त्या ऑपरेशन सिंदूरच्या विरोधात नाहीत. मात्र, पंतप्रधान मोदी देशभर प्रचारासाठी या ऑपरेशनचा वापर करत आहेत. “पंतप्रधान जे बोलत आहेत, ते चुकीचं आहे. विरोधक देशाची प्रतिष्ठा जपण्यासाठी, लोकशाहीचा आवाज जगापर्यंत पोहोचवण्यासाठी परदेशात जात आहेत. देशाला बदनाम करण्यासाठी नव्हे, असं त्यांनी म्हटलं आहे.

दम असेल तर उद्याच निवडणुकीची तारीख जाहीर करा

ममतांनी पंतप्रधानांना थेट आव्हान दिलं आहे “जर खरोखरच दम असेल, तर उद्याच निवडणुकीची तारीख जाहीर करा. बंगाल तयार आहे.” मोदींनी बंगलाच्या महिलांचा अपमान केला आहे. आम्ही आदर करतो, पण आत्मसन्मान गहान ठेवून नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मोदींना थेट चर्चेचं आव्हान

ममतांनी पंतप्रधान मोदींना टीव्हीवर थेट चर्चेचं आव्हान दिलं आहे. “जर हिंमत असेल तर माझ्याशी लाईव्ह डिबेटमध्ये या. टेलिप्रॉम्प्टर घेऊन यायचं असेल तर तेही चालेल,” असं त्यांनी ठणकावून सांगितलं. तसेच, त्यांनी भाजपकडून ‘ऑपरेशन बंगाल’ची योजना पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला.

मध्य प्रदेशातील भाजप नेते मनोरलाल धाकड यांच्या प्रकरणावरूनही ममतांनी निशाणा साधला. “मध्य प्रदेशात जे झालं, त्यावर तुम्हाला लाज वाटत नाही का? जणू रस्त्यावर अश्लील व्हिडिओ दाखवले जात आहेत,” असं म्हणत त्यांनी भाजपच्या महिला विषयक दृष्टीकोनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. भाजप बंगालची प्रतिमा खराब करत आहे, असा आरोप करत ममतांनी म्हटलं, “पंतप्रधान मोदी अमेरिकेने काही म्हटलं की शांत बसतात. पण इथे मात्र बंगालला बदनाम करत आहेत.” त्यांनी भाजपवर इतिहास पुसण्याचा, गांधीजींचं नाव हटवण्याचा आरोपही केला.

Yamuna Water : लोकसभा निवडणुकीपर्यंत यमुनेचे पाणी पिण्यायोग्य बनवणार: केंद्र सरकारडून नवं मॉडेल तयार

“बंगाल ही टागोर, विवेकानंद, गांधीजींची भूमी आहे. भाजप त्यांचा अपमान करत आहे. बंगाल कधीही भाजपला स्वीकारणार नसल्याचं त्यां म्हणाल्या. ममता बॅनर्जींच्या या आरोपांनी आणि आव्हानांनी आगामी निवडणुकांमध्ये राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.

Web Title: West bengal cm mamata banerjee challenge to pm narendra modi on politics on operation sindoor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 05:29 PM

Topics:  

  • Mamata Banerjee
  • Operation Sindoor
  • PM Modi Speech

संबंधित बातम्या

CM Mamata Banerjee : बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावे, दरमहा ५ हजार देणार… ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
1

CM Mamata Banerjee : बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावे, दरमहा ५ हजार देणार… ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images
2

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”
3

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”

Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’मधील शौर्यासाठी भारतीय जवानांचा गौरव; ९ वीरांना ‘वीर चक्र’ जाहीर
4

Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’मधील शौर्यासाठी भारतीय जवानांचा गौरव; ९ वीरांना ‘वीर चक्र’ जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.