SIR साठी बंगाल तयार नाही, 2 वर्षांनंतर या; ममता बॅनर्जी सरकारचं निवडणूक आयोगाला उत्तर
बिहारमधील मतदार यादी विशेष फेरपडताळणीची (SIR) प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निवडणूक आयोगाने आणखी ५ राज्यांमध्येही ही प्रक्रिया राबवली जाईल असं म्हटलं आहे, त्यात पश्चिम बंगालचाही समावेश आहे. त्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल एसआयआरसाठी तयार नाही. त्यासाठी दोन वर्षांचा कालावधी द्या, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
अलीकडेच, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून म्हटले होते की बंगाल SIR साठी तयार आहे, मात्र आता बंगाल सरकारने त्याला नकार दिला आहे. मुख्य सचिवांनी राज्याची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाला घाईघाईने पत्र पाठवलं. मुख्य सचिव पंत यांनी पाठवलेल्या पत्रातही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्या पत्रात असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे की, सीईओ कार्यालयाने राज्याशी सल्लामसलत न करता आयोगाला पत्र का पाठवले?
केंद्रीय राज्यमंत्री सुकांता मजुमदार म्हणाले, ‘सर्व काही समजण्यासारखे आहे. ते कोणत्याही प्रकारे एसआयआरला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत कारण, जर मतदार यादीत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली तर रोहिंग्यांच्या मतांनी जिंकलेले हे सरकार हपडे.देशाचे सार्वभौमत्व वाचवण्यासाठी आयोग निश्चितच योग्य पावले उचलेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
Rahul Gandhi Press : राहुल गांधी यांनी थेट दाखवले पुरावे! निवडणूक आयोगावर मत चोरीचा गंभीर आरोप
दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते अरुप चक्रवर्ती यांनी दावा केला की, ‘एसआयआरसोबत तमाशा सुरू आहे. राहुल गांधींनी माहिती गोळा करून मतांची चोरी दाखवली आहे. निवडणूक आयोगाने प्रथम त्याचे उत्तर द्यावे.’ एसआयआरवरून आयोग आणि विरोधकांमध्ये संघर्ष वाढत आहे. बिहारमध्ये एसआयआर टप्पा पूर्ण झाल्यानंतर लगेचच हा संघर्ष सुरू झाला.
गेल्या वर्षी देशभरात लोकसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकाही पार पडल्या. पण या निवडणुकांनंतर लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी सातत्याने निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप करत आहेत. अशातच काल ( ७ ऑगस्ट) राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत पुन्हा एक पत्रकार परिषद घेऊन थेट केंद्रीय निवडणूक आयोगावरच गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांनी कर्नाटक राज्यातील निवडणुका आणि महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकांचा संदर्भ देत थेट पुराव्यानिशी गंभीर आरोप केले आहेत.