निवडणूक आयोगाच्या मतदान चोरीवर काँग्रेस राहुल गांधींची पत्रकार परिषद घेत आरोप केले आहे (फोटो - सोशल मीडिया)
Rahul Gandhi Press : नवी दिल्ली : खासदार राहुल गांधी यांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी कॉंग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आक्रमक पवित्रा दिसून आला. अनेक व्हिडिओ, फोटो आणि डेटाच्या सहाय्याने राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी निवडणुकीमध्ये आयोगाकडून मतांची चोरी केली जात असल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रतील विधानसभा निवडणुकींमध्ये देखील मतांची चोरी झाली असल्याचा मोठा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
पुराव्यानिशी पत्रकार परिषद घेताना कॉंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, निवडणूक आयोगाने विरोधकांना, काँग्रेसला कधीच डिजिटल डेटा दिला नाही. एकाच व्यक्तीचं कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात मतदान केले आहे. आदित्य श्रीवास्वत नावाच्या व्यक्तीचा दाखला देत त्यांनी निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. आयोगाने आम्हाला डेटा दिला नाही. पण आम्ही त्यांना पुरावे दिले असा टोला त्यांनी लगावला. हा डेटा खरा असल्यामुळेच निवडणूक आयोग माझ्यावर कारवाई करत नाही, असे देखील राहुल गांधी म्हणाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या अगदी शेवटच्या तासांमध्ये मतदानाचे प्रमाण वाढले असल्याचे अनेकदा राहुल गांधी म्हणाले आहे. आता पत्रकार परिषद घेत ते म्हणाले की, महाराष्ट्रात ५ महिन्यांत बरेच नवीन मतदार जोडले गेले आहेत, हे ५ वर्षांपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे आम्हाला शंका आली. आमच्या युतीचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला, पण आम्ही लोकसभा निवडणुकीत विजयी झालो. महाराष्ट्र निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आम्हाला संशय आहे. अचानक एक कोटी नवीन मतदार कुठून आले? आम्ही निवडणूक आयोगाकडे मतदार यादी मागितली, पण त्यांनी मतदार यादी दिली नाही.
#WATCH | Delhi: Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi says, “…In Maharashtra, the addition of more voters in 5 months than in 5 years raised our suspicions and then a huge jump in voter turnout after 5 pm. In Vidhan Sabha, our alliance was wiped and in Lok Sabha, our… pic.twitter.com/wFAQTuyJcM
— ANI (@ANI) August 7, 2025
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेतून भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “लोकशाहीत, प्रत्येक पक्षाला सत्ताधारी पक्षाच्या विरोधाचा सामना करावा लागतो, परंतु त्याचा भाजपवर परिणाम का होत नाही हे मला माहित नाही आणि तो एकमेव असा पक्ष आहे. पूर्वी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे नव्हती, तरीही संपूर्ण देश एकाच दिवशी मतदान करत असे. आता मतदान महिने चालते. वेगवेगळ्या दिवशी मतदान का केले जाते?” असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे राहुल गांधी म्हणाले की, “आम्हाला आढळले की लोकसभा आणि विधानसभेदरम्यान, एक कोटी नवीन मतदार या खेळात आले. आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो आणि हा लेख लिहिला आणि आमच्या युक्तिवादाचा गाभा असा होता की महाराष्ट्र निवडणूक चोरीला गेली. समस्येचे गाभा काय आहे? मतदार यादी ही या देशाची मालमत्ता आहे. निवडणूक आयोग आम्हाला मतदार यादी देण्यास नकार देतो… आणि मग त्यांनी एक अतिशय मनोरंजक गोष्ट केली. त्यांनी सांगितले की आम्ही सीसीटीव्ही फुटेज नष्ट करणार आहोत. हे आमच्यासाठी आश्चर्यकारक होते कारण महाराष्ट्रात संध्याकाळी ५.३० नंतर मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचा प्रश्न होता जेणेकरून संख्या वाढेल. आमच्या लोकांना माहित होते की मतदान केंद्रांवर असे काही घडले नाही. संध्याकाळी ५.३० नंतर मोठ्या प्रमाणात मतदान झाले नाही. या दोन गोष्टींमुळे आम्हाला खात्री पटली की भारतीय निवडणूक आयोग निवडणुका चोरण्यासाठी भाजपशी संगनमत करत आहे…” अशी आक्रमक भूमिका खासदार राहुल गांधी यांनी घेतली आहे