West Bengal Mamata Banerjee criticized for AAP defeat in Delhi assembly elections
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा धुव्वाधार विजय झाला आहे. तर आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने २७ वर्षांनी मोठा विजय प्राप्त केला. दिल्लीच्या निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांचा देखील पराभव झाला आहे. देशभरातील भाजपचे नेते जल्लोष व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालमधील भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनीही दिल्लीतील विजयाचा आनंद व्यक्त केला. आता पश्चिम बंगालमध्ये देखील भाजप देखील विजयाची स्वप्न पाहत आहेत.
पश्चिम बंगालमधील भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनीही दिल्लीतील विजयाचा आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांनी असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना इशारा दिला आहे. दिल्लीच्या निकालानंतर माध्यमांशी बोलत असताना अधिकारी म्हणाले, “दिल्ली की जीत हमारी, 2026 मै बंगाल की बारी” असा नारा सुवेंदू अधिकारी यांनी दिला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्यामुळे आता दिल्लीनंतर भाजपचे मिशन हे पश्चिम बंगाल राहणार आहे. यामुळे ममता बॅनर्जी यांची चिंता वाढली आहे. बंगालमधील भाजपाचे आणखी एक नेते सुकांता मजुमदार यांनी देखील दिल्लीतील विजयानंतर पश्चिम बंगालवर निशाणा साधला आहे ते म्हणाले की, पुढील निवडणुकीत बंगालमधील जनताही दिल्लीप्रमाणेच मतदान करेल. अधिकारी आणि मजुमदार या दोन्ही नेत्यांनी दिल्लीमधील विजयासाठी हातभार लावणाऱ्या बंगाली मतदारांचे आभार मानले. ममता बॅनर्जी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दिला होता. यामुळे भाजप नेत्यांनी ममता बॅनर्जींवर देखील निशाणा साधला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत अपडेट घ्या जाणून
भाजपाचे बंगालवर लक्ष
पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. दिल्लीप्रमाणेच इथेही भाजपाला यश मिळालेले नाही. गेल्या दशकभरापासून इथे ममता बॅनर्जी यांची सत्ता आहे. भाजपाच्या नेत्यांनी ममता बॅनर्जी यांना दिलेला इशारा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दिलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील काही निवडणुकांत पश्चिम बंगालमध्ये जोरदार प्रचार करूनही २०१९ आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे अधिक खासदार निवडून आले. तर २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा विजय झाला. तसेच २०२१ च्या कोलकाता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही तृणमूलने भाजपाचा जोरदार पराभव केला.
AAP च्या पराभवाची कारणे आणि त्याचा प्रभाव
गेल्या ११ वर्षांपासून दिल्लीच्या सत्तेवर असलेल्या AAP ला यंदा मोठा धक्का बसला आहे. पक्षाची जागा केवळ २२ वर आली, तर भाजपने ४८ जागांवर विजय मिळवत २७ वर्षांनंतर सत्ता काबीज केली. या पराभवामुळे केजरीवाल यांच्या दिल्ली मॉडेलवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पक्षाच्या राष्ट्रीय विस्ताराच्या योजना धोक्यात आल्या आहेत. गेल्या २७ वर्षांपासून विरोधात असलेली भाजप आता प्रचंड बहुमताने सत्ता स्थापन करणार आहे, तर ११ वर्षे सत्तेत असलेला AAP पक्ष पहिल्यांदाच विरोधी बाकावर बसेल. सत्ता असताना विरोधी नेत्यांना सभागृहाबाहेर काढणारे केजरीवाल आता विरोधात राहून कसे लढतील, हा मोठा प्रश्न आहे. सौरभ भारद्वाज आणि मनीष सिसोदिया यांचा पराभव झाल्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते कोण असतील, हे अद्याप स्पष्ट नाही. गोपाल राय आणि आतिशी यांनी निवडणूक जिंकली असून, ते या भूमिकेसाठी महत्त्वाचे ठरू शकतात.