Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi CM attack:मुख्यमंत्र्यांवर हल्ला करणाऱ्याला काय आहे शिक्षेची तरतूद? या कलमांतर्गत दाखल होतो गुन्हा

कायदेशीरदृष्ट्या, मुख्यमंत्री किंवा कोणत्याही व्यक्तीवर अशा प्रकारे हल्ला करणे हा भारतीय दंड संहितेच्या कलम ११५ अंतर्गत गुन्हा मानला जातो. यात स्वेच्छेने दुखापत कण्याच्या उद्देशाने बोलण्यात आले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 20, 2025 | 03:08 PM
Delhi CM attack:मुख्यमंत्र्यांवर हल्ला करणाऱ्याला काय आहे शिक्षेची तरतूद? या कलमांतर्गत दाखल होतो गुन्हा
Follow Us
Close
Follow Us:
  • दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला
  • हल्लेखोराला काय आहे शिक्षेची तरतूद
  • काय आहे BNS कलम ११५

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या सरकारी निवासस्थान सिव्हिल लाईन्स येथे जनसुनावणीदरम्यान त्यांच्यावर हल्ला झाल्यामुळे दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी (२० ऑगस्ट) झाले जनसुनावणी कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीने प्रथम मुख्यमंत्र्यांना काही कागदपत्रे दिली आणि नंतर अचानक त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी आरोपीला तात्काळ पकडून ताब्यात घेतले. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या खांद्याला आणि डोक्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. पण या घटनेमुळे राजकीय वर्तुळात सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले

आरोपींची ओळख आणि चौकशी

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपीने आपले नाव राजेशभाई खिमजी असे सांगितले असून तो गुजरातमधील राजकोटचा रहिवासी असल्याचा दावा केला आहे. सध्या, त्याने मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना दुखावण्याचा हेतू काय होता याची तपासणी सुरू आहे. चौकशीदरम्यान, आरोपी तुरुंगात असलेल्या आपल्या एका नातेवाईकाच्या सुटकेसाठी अर्ज घेऊन आला होता असे समोर आले आहे. घटनेच्या वेळी मुख्यमंत्री जनसुनावणीदरम्यान लोकांच्या तक्रारी ऐकत होत्या. त्याच वेळी अचानक हल्ला झाला. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, “आम्हाला मागून आवाज आला, आणि समजण्याआधीच पोलिसांनी हल्लेखोराला पकडले.” हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता पूर्णपणे हादरल्या होत्या. पण या घटनेनंतर मुख्यमंत्री किंवा कोणत्याही हल्ला करणाऱ्या आरोपीला काय शिक्षा मिळते, असाही प्रश्न उपस्थित होतो.

BNS कलम ११५ कायद्यातील तरतुदी

कायदेशीरदृष्ट्या, मुख्यमंत्री किंवा कोणत्याही व्यक्तीवर अशा प्रकारे हल्ला करणे हा भारतीय दंड संहितेच्या कलम ११५ अंतर्गत गुन्हा मानला जातो. यात स्वेच्छेने दुखापत कण्याच्या उद्देशाने बोलण्यात आले आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ११५ नुसार, जर एखाद्या व्यक्तीने जाणीवपूर्वक दुसऱ्या व्यक्तीला दुखापत केली तर त्याला गुन्हा मानले जाईल. यासाठी गुन्हेगाराला एक वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा १० हजारांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. अशातच रेखा गुप्ता यांच्यावरही हल्ला हा मुख्यमंत्र्यांवर हल्ल्याचे प्रकरण असल्याने, पोलिस इतर कलमांखाली देखील गुन्हा दाखल करू शकतात.

Maharashtra Heavy Rain: पुणे, रायगडसह ‘या’ जिल्ह्यांत तुफान पाऊस कोसळणार; कोकणात तर उंचच उंच

BNS ११५ अंतर्गत येणाऱ्या प्रकरणांमध्ये

BNS ११५ मध्ये एखाद्याला थप्पड मारणे किंवा ठोसा मारणे यांचा समावेश आहे.

याशिवाय, जाणूनबुजून एखाद्याला ढकलून देणे देखील BNS ११५ कलमाअंतर्गत येते.

जर एखाद्या व्यक्तीने एखाद्यावर वस्तू फेकली तर त्या व्यक्तीविरुद्ध BNS ११५ अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

जर एखाद्याचे शरीर घट्ट धरून दुखापत करण्याचा प्रयत्न केला गेला तर त्याच्याविरुद्ध बीएनएस ११५ अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो.

विरोधी पक्ष आणि नेत्यांच्या प्रतिक्रिया
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्लायनंतर भाजपने या प्रकाराला गंभीर चूक असल्याचे म्हटले आहे. तर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने या घटनेचा निषेध केला आहे. जर मुख्यमंत्र्यांवरच हल्ला होत असेल तर सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेचाही मोठा प्रश्न निर्माण होतो, असही म्हटलं आहे.

 

 

Web Title: What is the punishment for attacking the chief minister a crime is registered under this section

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2025 | 03:08 PM

Topics:  

  • delhi CM
  • national news

संबंधित बातम्या

SRISIIM परिसरात जप्त केल्या अश्लील सीडी, लैंगिक खेळणी; Chaitanyananda चे PM Modi – Obama सह बनावट फोटो जप्त
1

SRISIIM परिसरात जप्त केल्या अश्लील सीडी, लैंगिक खेळणी; Chaitanyananda चे PM Modi – Obama सह बनावट फोटो जप्त

India’s 5th Gen Fighter Jet News: भारताचे 5th Gen Fighter Jet अंतिम टप्प्यात;  नेमकं काय आहे खास?
2

India’s 5th Gen Fighter Jet News: भारताचे 5th Gen Fighter Jet अंतिम टप्प्यात; नेमकं काय आहे खास?

Samudrayaan Mission: काय आहे भारताचे ‘मिशन समुद्रयान’; कधी सुरू होणार, काय फायदा होणार?
3

Samudrayaan Mission: काय आहे भारताचे ‘मिशन समुद्रयान’; कधी सुरू होणार, काय फायदा होणार?

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या तब्बेतीत बिघाड, रुग्णालयात दाखल; कशी आहे परिस्थिती?
4

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या तब्बेतीत बिघाड, रुग्णालयात दाखल; कशी आहे परिस्थिती?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.