Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Phaltan Doctor suicide :’जेव्हा सत्ताच गुन्हेगारांची ढाल होते..’; डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर राहुल गांधींचा राज्य सरकारवर घणाघात

गुन्हेगारांपासून जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी सोपवलेल्या व्यक्तीने या निष्पाप महिलेवर सर्वात घृणास्पद गुन्हा केला. त्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे शोषण केले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 26, 2025 | 01:46 PM
Rahul Gandhi attacks the state government on the Phaltan doctor suicide case

Rahul Gandhi attacks the state government on the Phaltan doctor suicide case

Follow Us
Close
Follow Us:
  • फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे राजकारण तापणार
  • ट्विटर एक्सवर पोस्ट करत राहुल गांधींची महाराष्ट्र सरकारवर टीका
  • ही आत्महत्या नाही तर संस्थात्मक हत्या- राहुल गांधी

Rahul Gandhi News: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. मृत महिलेने तळहातावर लिहीलेल्या सुसाईट नोटमध्ये आरोपींची नावे लिहील्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणातील दोन्ही मुख्य आरोपी प्रशांत बनकर आणि गोपाल बदने यांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. पण या प्रकरणावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मात्र थेट राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

रविवारी (२६ ऑक्टोबर २०२५) X वरील एका पोस्ट करत राहुल गांधींनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रातील सातारा येथे लैंगिक छळ आणि बलात्कार झाल्यानंतर एका महिला डॉक्टरची आत्महत्या ही कोणत्याही सुसंस्कृत समाजाच्या विवेकाला हादरवून टाकणारी शोकांतिका आहे. इतरांचे दुःख कमी करण्याची आकांक्षा बाळगणारा एक आशादायक डॉक्टर भ्रष्ट शक्ती आणि व्यवस्थेतील गुन्हेगारांच्या छळाला बळी पडला.

संस्कृती बालगुडेचा ‘कृष्ण’ अवतार सोशल मीडियावर व्हायरल, नवीन प्रोजेक्टची झलक की खास फोटोशूट?

ही आत्महत्या नाही तर संस्थात्मक हत्या – राहुल गांधी

राहुल गांधी म्हणाले, गुन्हेगारांपासून जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी सोपवलेल्या व्यक्तीने या निष्पाप महिलेवर सर्वात घृणास्पद गुन्हा केला. त्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे शोषण केले. वृत्तांनुसार, भाजपशी संबंधित काही प्रभावशाली लोकांनीही तिच्यावर भ्रष्टाचार करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. सत्तेच्या संरक्षणाखालील गुन्हेगारी विचारसरणीचे हे सर्वात घृणास्पद उदाहरण आहे. ही आत्महत्या नाही तर संस्थात्मक हत्या आहे.” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधींचा महाराष्ट्रातील भाजप सरकारवर निशाणा

त्याचबरोबर, “जेव्हा सत्ता गुन्हेगारांना संरक्षण देते, तेव्हा आपण कोणाकडून न्यायाची अपेक्षा करू शकतो? असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. महिला डॉक्टरच्या मृत्यूने या भाजप सरकारचा अमानवी आणि असंवेदनशील चेहरा उघडकीस आणला आहे. न्यायाच्या या लढाईत आम्ही पीडितेच्या कुटुंबासोबत ठामपणे उभे आहोत. भारतातील प्रत्येक कन्येला भीतीची नव्हे तर न्यायाची गरज आहे.”

भारतीय संघाचा पुढील सामना कधी? जाणून घ्या IND vs AUS T20 मालिकेच्या तारखा आणि वेळ, वाचा सविस्तर

संपूर्ण प्रकरण काय आहे?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून डॉक्टर पोलिस आणि आरोग्य विभागामध्ये वादात अडकली होती. वैद्यकीय तपासणीवरून तिचा पोलिस अधिकाऱ्यांशी वाद झाला होता, त्यानंतर तिच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली होती.   आत्महत्येच्या पत्रात मृत महिलेने पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने यांच्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. सुसाईड नोटमधील दुसरे नाव मृताच्या घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर यांचे आहे, ज्याला अटक करण्यात आली आहे.

 

Web Title: When power becomes a shield for criminals rahul gandhi attacks the state government on the phaltan doctor suicide case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2025 | 01:45 PM

Topics:  

  • Rahul Gandhi
  • Satara Crime News

संबंधित बातम्या

Satara Doctor Suicide Case:  सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण: फरार आरोपी PSI गोपाळ बदनेलाही अटक
1

Satara Doctor Suicide Case: सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण: फरार आरोपी PSI गोपाळ बदनेलाही अटक

Breaking! फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; आरोपी प्रशांत बनकरला ४ दिवसांची पोलीस कोठडी
2

Breaking! फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; आरोपी प्रशांत बनकरला ४ दिवसांची पोलीस कोठडी

Phaltan Suicide Case: फलटण डॉक्टर महिलेच्या सुसाईड नोटमध्ये कोणत्या खासदाराचे नाव? अंबादास दानवेंचे गंभीर आरोप
3

Phaltan Suicide Case: फलटण डॉक्टर महिलेच्या सुसाईड नोटमध्ये कोणत्या खासदाराचे नाव? अंबादास दानवेंचे गंभीर आरोप

Satara Crime news: साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोपी प्रशांत बनकरला अटक
4

Satara Crime news: साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोपी प्रशांत बनकरला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.