नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरचे (Jammu Kashmir) माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी केलेल्या पुलवामा हल्ल्यासंदर्भातील (Pulwama Attack) आरोपांना उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या दाव्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावरुन आता गृहमंत्री अमित शाह यांनी सत्यपाल मलिक यांना चांगलेच सुनावले आहे. ‘भाजप सरकारने असे कोणतेही काम केलेले नाही जे लोकांपासून लपवावे लागेल. “तुम्ही सत्तेत असताना याविषयी का बोलले नाहीत असं शाह यांनी म्हण्टलं आहे.
[read_also content=”उद्धव ठाकरेंची आज जळगावात मोठी सभा; ठाकरे गटाकडुन तयारी पुर्ण, तर शिंदे गटाकडून सभा उधळण्याचा इशारा https://www.navarashtra.com/maharashtra/uddhav-thackerays-big-meeting-in-jalgaon-today-prepared-by-the-thackeray-group-nrps-390410.html”]
पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या वेळी जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल असलेले मलिक यांनी अलीकडील एका मीडिया मुलाखतीत आरोप केला की सीआरपीएफने सैनिकांना नेण्यासाठी विमान मागितले होते परंतु केंद्रीय गृह मंत्रालयाने ही विनंती नाकारली होती. हा हल्ला सीआरपीएफ आणि गृह मंत्रालयाच्या “अक्षमतेचा” परिणाम असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच या मार्गाचे स्वच्छतेचे काम प्रभावीपणे झाले नसल्याचा दावाही त्यांनी केला. या टिप्पण्यांमुळे प्रचंड राजकीय वादळ उठले आणि विरोधी पक्षांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
दरम्यान, सत्यपाल मलिका यांना सीबीआयने समन्स जारी केल्यानंतर, या वरुन राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगु लागली होती. या विषयी बोलताना अमित शाह म्हणाले की, मलिक यांच्या वक्तव्याचा आणि सीबीआयने त्यांना जारी केलेल्या समन्सचा काहीही संबंध नाही. “माझ्या माहितीनुसार, त्याला दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा बोलावण्यात आले आहे. चौकशी सुरू आहे, काही नवीन माहिती किंवा पुरावे समोर आले असावेत आणि त्याला तिसऱ्यांदा बोलावण्यात आले आहे. यात काहीही तथ्य नाही. आमच्या विरोधात बोलण्यासाठी बोलावले आहे, ”असे शाह कर्नाटकातील एका खाजगी कार्यक्रमात म्हणाले. जम्मू-काश्मीरमधील कथित विमा घोटाळ्याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी मलिक यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पाचारण केले आहे.