Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Pakistan Ceasefire : युद्धबंदीची घोषणा प्रथम अमेरिकेने का केली? काँग्रेसचा केंद्र सरकारला सवाल

भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या ताज्या युद्धविराम (Ceasefire) घोषणेनंतर काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला आहे

  • By संदीप गावडे
Updated On: May 15, 2025 | 12:29 AM
युद्धबंदीची घोषणा अमेरिकेने का केली? काँग्रेसचा केंद्र सरकारला सवाल

युद्धबंदीची घोषणा अमेरिकेने का केली? काँग्रेसचा केंद्र सरकारला सवाल

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीच्या घोषणेनंतर काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. भारताच्या भूमीवर घडणाऱ्या गंभीर राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची मौन का धारण  केलं आहे आणि अमेरिकेच्या हस्तक्षेपाने युद्धबंदीची घोषणा करणे ही बाब देशासाठी चिंताजनक नाही का?, असा सवाल सरकारला केला आहे.

सीजफायरची घोषणा अमेरिकेतून का?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “देशाची जनता आणि आमची सेना यांना विश्वासात न घेताच, युद्धविरामासारख्या गंभीर घोषणांची माहिती आधी अमेरिकेच्या माध्यमातून कशी काय मिळते? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, अमेरिका या सीजफायरसाठी जबाबदार आहे. मग भारत सरकारने स्वतः घोषणा का केली नाही?”

“आज देशभरात प्रश्न विचारले जात आहेत, पण पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची यावर प्रतिक्रिया नाही. यावर मौन म्हणजे जबाबदारी झटकणे.” काँग्रेसने पंतप्रधानांवर टीका करत म्हटलं  आहे की, ते सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होत नाहीत, विरोधी पक्षांच्या पत्रांना उत्तर देत नाहीत आणि फक्त एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशीच संवाद साधतात.

सर्वपक्षीय बैठक,  संसद विशेष अधिवेशनाची मागणी

“पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशात जी अस्थिरता आहे, त्यावर संसदेत सविस्तर चर्चा होणे गरजेचे आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहून संसदेत विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.”

‘ऑपरेशन सिंदूर’चं राजकारण केलं

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेड़ा यांनीही केंद्र सरकारवर जोरदार टीका करत म्हटले की, “ऑपरेशन सिंदूर ही देशासाठी गर्वाची बाब आहे, ती कोणत्याही पक्षाची जागीर नाही. पण भाजप याचा केवळ राजकीय प्रचारासाठी वापर करत आहे. हे देशहिताच्या विरोधात आहे.”

‘जय हिंद रॅली’ची घोषणा

काँग्रेसने देशभरात ‘जय हिंद रॅली’ काढण्याची घोषणा केली आहे. या माध्यमातून काँग्रेस देशवासियांना केंद्र सरकारच्या पारदर्शकतेच्या अभावावर जागरूक करणार आहे. पक्षाचे म्हणणे आहे की, ऑपरेशन सिंदूरचा वापर केवळ राजकीय लाभासाठी केला जात असून, त्याविरोधात जनतेमध्ये सत्य मांडणे गरजेचे आहे.

राहुल गांधीची शुक्रवारी पत्रकार परिषद

या संपूर्ण विषयावर राहुल गांधी शुक्रवारी पत्रकार परिषद घेणार असून, युद्धबंदी, ऑपरेशन सिंदूर आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर सविस्तर भाष्य करणार आहेत. काँग्रेसने केंद्र सरकारकडून उत्तर मागत स्पष्ट विचारले आहे की, भारताच्या सार्वभौम सुरक्षेशी निगडित निर्णयांची माहिती जर आधी अमेरिका देत असेल, तर भारतीय नागरिकांना विश्वासात का घेतले जात नाही? पंतप्रधानांनी बाळगलेल्या मौनाबाबत आता देशभरात आवाज उठू लागला आहे. असं कॉंग्रेसने म्हटलं आहे.

Web Title: Why first ceasefire announced by america congress raised questions to modi government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 11:48 PM

Topics:  

  • Congress
  • India Pakistan Ceasefire
  • Operation Sindoor

संबंधित बातम्या

मामा राहिला बाजूला अन् भाच्याने उरकले लग्न: राहुल गांधी आले सलमानच्या रांगेत?
1

मामा राहिला बाजूला अन् भाच्याने उरकले लग्न: राहुल गांधी आले सलमानच्या रांगेत?

Karnatak News: EVMवर जनतेचा प्रचंड विश्वास; कर्नाटक काँग्रेस सरकारच्या सर्वेक्षणातून निष्कर्ष, भाजपचा राहुल गांधींवर हल्लाबोल
2

Karnatak News: EVMवर जनतेचा प्रचंड विश्वास; कर्नाटक काँग्रेस सरकारच्या सर्वेक्षणातून निष्कर्ष, भाजपचा राहुल गांधींवर हल्लाबोल

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले
3

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

Priyanka Gandhi Son : प्रियांका गांधी होणार सासू! मुलाच्या होणाऱ्या बायकोने केला होता जोरदार प्रचार
4

Priyanka Gandhi Son : प्रियांका गांधी होणार सासू! मुलाच्या होणाऱ्या बायकोने केला होता जोरदार प्रचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.