Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगाला ज्ञान शिकणवाऱ्यांचे वैयक्तिक जीवनच वादग्रस्त; मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रांविरोधात एफआयआर; वाचा यावरील सविस्तर रिपोर्ट

  • By युवराज भगत
Updated On: Dec 23, 2023 | 03:00 PM
जगाला ज्ञान शिकणवाऱ्यांचे वैयक्तिक जीवनच वादग्रस्त; मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रांविरोधात एफआयआर; वाचा यावरील सविस्तर रिपोर्ट
Follow Us
Close
Follow Us:

Vivek Bindra : जगाला ज्ञान शिकवणारे मोटिव्हेशनल स्पीकरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादग्रस्त आणि वैफल्यग्रस्त ठरत असल्याने सामान्य मनुष्याने कोणाकडे पाहावे, हा एक प्रश्नच आहे. सध्या मोटिव्हेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यातील वाद चर्चेत आहे. दरम्यान, विवेक बिंद्रा एका प्रकरणात चांगलाच अडकला आहे. 6 डिसेंबर 2023 रोजी विवेक बिंद्राचा यानिकाशी विवाह झाला होता. लग्नानंतर अवघ्या आठवडाभरातच विवेकने पत्नीला मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी विवेकविरोधात नोएडामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवेक बिंद्रा विरुद्ध संदीप महेश्वर यांच्यातील वाद चव्हाट्यावर

मोटिव्हेशनल स्पीकर आणि सोशल मीडियावर प्रभाव टाकणारा लाइफ कोच विवेक बिंद्रा विरुद्ध संदीप महेश्वर यांच्यातील वाद सध्या सोशल मीडियावर चांगलाच रंगत आहे. दरम्यान, विवेक बिंद्रा आता नवीन एका प्रकरणात चांगलाच अडकला आहे. त्याच्यावर पत्नीशी गैरवर्तन आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. नोएडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

विवेक बिंद्रांच्या पत्नीने केला गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, विवेक बिंद्राने 6 डिसेंबर 2023 रोजी यानिकाशी लग्न केले होते. लग्नाच्या अवघ्या आठ दिवसांनंतर, 14 डिसेंबर रोजी विवेक विरुद्ध नोएडा सेक्टर 126 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, ज्यामध्ये विवेक बिंद्राने पत्नी यानिकावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

विवेकचा एक व्हिडिओही समोर

विवेक बिंद्राचा मेहुणा वैभव क्वात्रा याने नोएडातील सेक्टर 126 पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. त्यात त्याने सांगितले की, त्याची बहीण यानिकाचा विवाह विवेक बिंद्रासोबत 6 डिसेंबर 2023 रोजी ललित मानगर हॉटेलमध्ये झाला होता. विवेक बिंद्रा नोएडामधील सुपरनोव्हा वेस्ट रेसिडेन्सी सेक्टर 94 मध्ये राहतो. विवेकचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये तो पत्नीसोबत वाद घालताना दिसत आहे.

वैभव क्वात्रा यांनी सांगितले की, 7 डिसेंबरला पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास मेव्हणा विवेक बिंद्रा त्याच्या आईशी वाद घालत होता. यादरम्यान बहीण यानिकाने मध्यस्थी केली असता विवेकने तिला खोलीत बंद करून शिवीगाळ केली. यानंतर मारहाण झाली, त्यामुळे यानिकाच्या शरीरावर जखमा झाल्या. यानिकाला कानानेही नीट ऐकू येत नाही. त्यांना दिल्लीतील कैलास दीपक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

14 डिसेंबर रोजी नोएडात गुन्हा दाखल

14 डिसेंबर रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु विवेक बिंद्रा आणि संदीप माहेश्वरी यांच्यातील वाद चर्चेत असताना हे उघड झाले. दोन प्रसिद्ध युट्युबरमधील वाद सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे. पोलिसांनी विवेकविरुद्ध भादंविच्या कलम ३२३, ५०४, ४२७ आणि ३२५ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तपासात जे काही समोर येईल त्याआधारे कारवाई केली जाईल.

संदीप माहेश्वरीसोबतचा वाद कसा सुरू झाला?

संदीप माहेश्वरी यांनी अलीकडेच त्यांच्या चॅनलवर बिग स्कॅम एक्सपोज नावाचा व्हिडिओ शेअर केला आहे. बडा बिझनेस प्रायव्हेट लिमिटेडने आपली फसवणूक केल्याचा दावा या व्हिडिओमध्ये दोन विद्यार्थ्यांनी केला होता. या व्हिडिओनंतर काही दिवसांनी विवेक बिंद्राने संदीप माहेश्वरीच्या आरोपांना उत्तर देताना सांगितले की, त्यांनी दुसऱ्या पक्षालाही विचारायला हवे होते.

 

संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा हे अनेक दिवसांपासून चर्चेत

संदीप माहेश्वरी विरुद्ध विवेक बिंद्रा यांच्यातील वाद काही दिवसांपूर्वी महेश्वरीने त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला तेव्हापासून सुरू झाला. या व्हिडिओमध्ये, दोन मुले संदीपला सांगतात की त्यांनी एका मोठ्या YouTuber कडून एक कोर्स विकत घेतला होता, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. ते व्यावसायिकांऐवजी सेल्समन तयार करत आहेत. एका मुलाने 50 हजार रुपये आणि दुसऱ्याने 35 हजार रुपयांना हा कोर्स घेण्याचे सांगितले होते. या व्हिडिओनंतर विवेक बिंद्रा पुढे आला आणि संदीप माहेश्वरीसोबत वाद सुरू झाला.

 

Web Title: Wife yanika is unable to hear has injuries all over her body what are the allegations against vivek bindra in fir nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2023 | 02:53 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.