
Election Commission Of India
Election Commission Of India, New Delhi : निवडणूक आयोग आज दुपारी सव्वा चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत मतदार यादीच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) संदर्भातील महत्त्वाचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात SIR प्रक्रिया राबविण्याचा निर्णय आयोग घेऊ शकतो. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात 10 ते 15 राज्यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विशेष म्हणजे, आगामी काळात ज्याठिकाणी विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांचा समावेश या पहिल्या टप्प्यात होऊ शकतो. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांचा यात समावेश असण्याची शक्यता आहे. तसेच आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यांनाही पहिल्या टप्प्यात स्थान मिळू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Satara Doctor Death Case: महिला डॉक्टर प्रकरणात PSI बदणेला मोठा धक्का; न्यायालयाचा मोठा निर्णय
मतदार यादीच्या प्रक्रियेवरून विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपांवर निवडणूक आयोग आज उत्तर देण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोगावर जोरदार टीका केली होती.
दरम्यान, १ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विरोधकांकडून निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. विरोधकांचा आरोप आहे की, राज्यात मतदार यादी व्यवस्थित तयार झालेल्या नाहीत, त्यामुळे निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या आयोगाच्या पत्रकार परिषदेत या सर्व आरोपांना आणि विरोधकांच्या भूमिकेला उत्तर दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने तीन दिवसांपूर्वीच दिल्लीत सर्व राज्ये आणि केंद्रशासत प्रदेशांच्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत SIR प्रक्रियेसंदर्भात चर्चा करण्यात आली. बिहारमध्ये एसाआयआर प्रक्रिया २४ जून ते ३० सप्टेंबर म्हणजेच तब्बल चार महिने सुरू होती. हा वेळ कमी करण्यासाठी आयोगाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. आजच्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात सविस्तर माहिती मिळण्याची शक्यता आहे.
‘तासातच मेलो असतो…’, मांस तुटून रक्तात मिसळत होतं, बोटं झाली कडक; Tilak Verma ला कोणता होता आजार?
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाकडून पुढच्या आठवड्यापासून देशभरात एसआयआर प्रक्रिया लाँच होऊ शकते. १० ते १५ राज्यातून याची सुरूवात होईल. एसआयआरची सुरूवात, ज्या राज्यांमध्ये येत्या वर्षभरात विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्या राज्यांपासून केली जाईल. यात आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये २०२६ मध्ये या राज्यांचा समावेश आहे.या राज्यांमध्ये येत्या वर्षभरात विधानसभा निवडणुका होणार आहेत.
याशिवाय, “ज्या राज्यांमध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांत स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) सध्या आयोजित केली जाणार नाही. खालच्या स्तरावरील कर्मचारी स्थानिक निवडणुकांच्या कामकाजात व्यस्त असल्याने SIR प्रक्रियेसाठी वेळ उपलब्ध होणार नाही. त्यामुळे या राज्यांमध्ये निवडणुका संपल्यानंतरच SIR प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.