Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीत यमुनेचं भीषण रूप; सखल भागातून ४१ हजार लोकांचं स्थलांतर, ओखला बॅरेजचे सर्व दरवाजे उघडले

दिल्लीतील यमुनेच्या पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हाच्या वर आहे. आज पहाटे पाच वाजता यमुनेच्या पाण्याची पातळी 207.08 इतकी नोंदवण्यात आली असून, 1978 नंतर पहिल्यांदाच ही पातळी नोंदवण्यात आली आहे. दिल्लीतील वाढता धोका लक्षात घेता ओखला बॅरेजचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jul 12, 2023 | 09:42 AM
दिल्लीत यमुनेचं भीषण रूप; सखल भागातून ४१ हजार लोकांचं स्थलांतर, ओखला बॅरेजचे सर्व दरवाजे उघडले
Follow Us
Close
Follow Us:

देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसानंतर दिल्लीतील यमुनेच्या पाण्याची पातळी (Yamuna water level rises) धोक्याच्या चिन्हावरुन वाहत आहे. जुन्या दिल्ली रेल्वे पुलावर आज सकाळी यमुनेच्या पाण्याची पातळी २०७ मीटर ओलांडली. वास्तविक, हरियाणातील हातिनीकुंड बॅरेजमधून तीन लाख क्युसेक पाणी सोडल्यानंतर यमुनेतील पाण्याचा विसर्ग वाढला आहे.

[read_also content=”महिलेच्या वेशात मेगा मार्टमध्ये घुसून 22 लाखांहून अधिक रोकड चोरली; मात्र, पुरुषांच्या चप्पलनं केला पर्दाफाश, ‘अशी’ झाली चोराला अटक https://www.navarashtra.com/crime/man-steals-more-than-22-lakh-cash-in-mega-mart-in-womens-gate-up-nrps-430665.html”]

आजतकने दिलेल्या माहितीनुसार,12 जुलै रोजी सकाळी 5 वाजता जुन्या दिल्ली रेल्वे पुलावर यमुनेच्या पाण्याची पातळी 207.08 नोंदवण्यात आली होती, तर सकाळी 7 वाजता ती 207.18 पर्यंत वाढली होती.  आतापर्यंत 1978 मध्ये यमुनेची कमाल जलपातळी 207.49 इतकी नोंदवण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी मंगळवारीच इशारा दिला होता की, दिल्लीतील यमुना नदीची पातळी सर्वोच्च आहे. मंगळवारीच यमुना नदीच्या पाण्याची पातळी 10 वर्षातील सर्वोच्च विक्रमी पातळी गाठली होती.

केंद्रीय जल आयोगाच्या फ्लड-मॉनिटरिंग पोर्टलनुसार, हरियाणाने हथनीकुंडमधून नदीत अधिक पाणी सोडल्यामुळे जुन्या रेल्वे पुलावरील पाण्याची पातळी सोमवारी संध्याकाळी 5 वाजता 205.4 मीटरवरून मंगळवारी रात्री 8 वाजता 206.76 मीटरपर्यंत वाढली. सीडब्ल्यूसीने यमुनेच्या पाण्याची पातळी 207 मीटरपर्यंत वाढण्याची आशाही व्यक्त केली होती.

पुराचे पाणी मोनस्ती मार्केटमध्ये घुसले

दिल्लीतील अनेक भागात पुराचे पाणी शिरले आहे. काश्मिरे गेटच्या मोनस्ती मार्केटमध्ये पुराचे पाणी पोहोचले आहे. येथे एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये रस्त्यावर पाणी वाहत असल्याचे दिसत आहे.
यमुना धोक्याच्या चिन्हावरुन वाहत आहे

यमुना नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने दिल्लीत पुराचा धोका आहे. यमुना धोक्याच्या चिन्हावरून 1.36 मीटर वर वाहत आहे. नदीचा प्रवाह कमी करण्यासाठी ओखला बॅरेजचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. दिल्लीत गेल्या दोन दिवसांत यमुनेच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. ते रविवारी सकाळी 11 वाजता 203.14 मीटरवरून सोमवारी संध्याकाळी 5 वाजता 205.4 मीटरपर्यंत वाढले आणि अपेक्षेपेक्षा 18 तास आधीच धोक्याचे चिन्ह 205.33 मीटर ओलांडले. सोमवारी रात्रीच जुना रेल्वे पूल रेल्वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

बचाव कार्यासाठी 45 बोटी तैनात

पाटबंधारे विभागाने मंगळवारी संध्याकाळी सांगितले की, सखल भागात राहणाऱ्या लोकांना उंचावरील सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. त्याचवेळी मदत आणि बचाव कार्यासाठी 45 बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, दिल्लीत पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी शहर सज्ज आहे. नदीच्या पाण्याची पातळी 206 मीटरच्या वर पोहोचताच, सखल भागातील लोकांचे स्थलांतर सुरू होईल.दिल्लीत नदीजवळचा सखल भाग संवेदनशील मानला जातो. या भागात सुमारे 41 हजार लोक राहतात. डीडीए, महसूल विभागाची जमीन असूनही गेल्या काही वर्षांपासून नदीच्या पूरक्षेत्रात अतिक्रमण झाले आहे.

1978 नंतर आता विक्रमी पातळीवर पोहोचली पाण्याची पातळी

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये यमुनेने दोनदा धोक्याचा टप्पा ओलांडला होता आणि पाण्याची पातळी २०६.३८ वर पोहोचली होती. त्याचप्रमाणे ऑगस्ट 2019 मध्ये हरियाणातून 8.28 क्युसेक पाणी सोडण्यात आले तेव्हा पाण्याची पातळी 206.6 वर पोहोचली. यापूर्वी 2013 मध्ये ती 207.32 मीटर आणि 1978 मध्ये नदीच्या पाण्याची पातळी 207.49 मीटर इतकी विक्रमी पातळी गाठली होती. थेट टीव्ही

Web Title: Yamuna water level rises beyond danger mark crosses 207 meter evacuation begins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2023 | 09:42 AM

Topics:  

  • Yamuna water

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.