अनेकदा आपण जेवण बाहेरुन ऑर्डर करतो. यासाठी आपण ऑनलाईन फूड डिलव्हरी अॅपची मदत घेतो. हवं त्या हॉटेलमधून हवं ते मागवता येतं. पण याच झोमॅटोने सोशल मिडीयाच्या माध्यमातून ग्राहकांना एक विनंती केली आहे.
देशभरात सध्या कडाक्याच्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले. काही भागात 45 अंशांवर तापमान आहेत. उष्णतेमुळे लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्याही अनेक ठिकाणाहून आल्या. याच सरसरत्या उन्हात घरपोच जेवण पोहचवणारे फूड डिलिव्हरी बॉय काम करत आहेत. अशावेळी भूक लागली का आपण कोणत्याही वेळेत जेवण ऑर्डर करतो. यासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato ने एक पोस्ट केली आहे. या पोस्टनंतर काही युजर्सने दुजोरा दिला तर काही युजर्सने टीका केली.
या पोस्टमध्ये Zomato ने लोकांना दुपारच्या वेळेत ऑर्डर न करण्याची विनंती केली आहे. झोमॅटोने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘दुपारी भर उन्हाच्या वेळी, अगदीच गरज नसेल तर खाद्यपदार्थ मागवणं टाळा’ असं म्हटलं आहे. सोशल मीडियावरील यूजर्सना झोमॅटोच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया देत, या पोस्टला आतापर्यंत 9.60 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तर 972 लोकांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काही नेटिझन्सनी कंपनीला पोस्ट लिहिण्यापेक्षा उपाययोजना करण्यास सांगितले आहे. तर काहींनी ग्राहकांना सल्ले देण्यापेक्षा फूड डिलिव्हरी कर्मचाऱ्यांसाठी उपाययोजना करण्यास सांगितली तर काहींनी या पोस्टला लाईक करून पाठिंबाही दिला आहे. एकाने १२ ते ४ पर्यंत सेवा बंद केल्यास काही हरकत नाही. नफ्यापेक्षा कधी कधी माणूस बनणे चांगले असते’ अशी प्रतिक्रिया एका युजरने नोंदवली आहे. तर दुसऱ्याने प्रत्येक ऑर्डरसाठी अनिवार्य “उष्णतेशी संबंधित टीप” किंवा “हार्डशिप चार्ज” ची कल्पना प्रस्तावित केली, ज्याचे पैसे संपूर्णपणे डिलिव्हरी रायडर्सना कठोर कामकाजाच्या परिस्थितीची भरपाई करण्यासाठी दिले जातात. काहींनी हा मार्केटिंग स्टंटबाजी म्हणून झोमॅटो कंपनीवर ताशेरे ओढले आहेत. (फोटो सौजन्य- ब्लूमबर्ग)






