Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वडूज शहरात विकासाचे नवे पर्व सुरु होणार : प्रा. बंडा गोडसे

वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदावर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना संधी देऊन वडूजकरांनी जाती-पातीच्या राजकारणाचे उच्चाटन केले आहे. या निमित्ताने वडूज शहरात विकासाचे नवे पर्व सुरु होणार आहे, असे मत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. बंडा गोडसे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 12, 2022 | 04:52 PM
वडूज शहरात विकासाचे नवे पर्व सुरु होणार : प्रा. बंडा गोडसे
Follow Us
Follow Us:

वडूज : वडूज नगरपंचायतीच्या (Vaduj Nagar Panchayat) नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदावर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना संधी देऊन वडूजकरांनी जाती-पातीच्या राजकारणाचे उच्चाटन केले आहे. या निमित्ताने वडूज शहरात विकासाचे नवे पर्व सुरु होणार आहे, असे मत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. बंडा गोडसे (Banda Godse) यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

प्रा. गोडसे म्हणाले, एका विशिष्ट धोरणाने सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे पाच, वंचित बहुजन आघाडीचा एक व अपक्ष तीन नगरसेवक एकत्र आले होते. नऊ नगरसेवक एकत्र आले तरी हे काठारचे गणित होते. यापैकी एकाने जरी जहाजातून उडी घेतली असती तर संपूर्ण जहाज बुडाले असते. मात्र, निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी प्रभावीपणे कॅप्टनशिप केली. तर दस्तूरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आशिर्वाद असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस यशापर्यंत पोहोचली आहे.

निवडणुकीच्या अगोदर दोन दिवस विरोधकांनी शेवटपर्यंत टोकाचे प्रयत्न केले. आमच्या गोटातील एक-दोन नगरसेवक फोडण्यासाठी सत्ता व लाखो, कोट्यावधी रुपयांचे अमिषे दाखविली गेली. त्याचबरोबर जाती-पातीचा मुद्दा उपस्थित करुन नगरसेवकांचा बुध्दीबेध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वच नगरसेवक व त्यांच्या पाठिराख्यांनी खंबीर भूमिका घेऊन विरोधकांना सत्तेत शिरकाव करण्याची संधी दिली नाही.

नगराध्यक्षपदासाठी मराठा बहुजन विशेषत: गोडसे समाजातील तीन उमेदवार असताना देखील धनगर समाजातील मनिषा काळे यांना नगराध्यक्षपदी तर उपनगराध्यक्षपदावरही ओबीसी प्रवर्गातील मनोज कुंभार यांना संधी देण्यात आली आहे. यापुढच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सर्व जाती-धर्मातील लोकांना एकत्र घेवून आघाडी शासनाचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर विकासकामे राबविण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय काँग्रेसच्या काही नेत्यांनी भाजपसारख्या जातीयवादी पक्षाबरोबर जाण्याचा विचार केला होता, असा गौप्यस्फोटही यावेळी प्रा. गोडसे यांनी यावेळी केला. यावेळी कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्रदादा गुदगे, हिंदुराव गोडसे, अशोकराव गोडसे, डॉ. महेश गुरव, विपुल गोडसे, पृथ्वीराज गोडसे, गणेश गोडसे, श्रीकांत काळे, रविंद्र काळे आदिंसह नगरसेवक उपस्थित होते.

Web Title: A new era of development will begin in the city of vaduj says banda godse nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2022 | 04:52 PM

Topics:  

  • Vaduj Nagar Panchayat

संबंधित बातम्या

वडूजलाच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व्हावं; खटाव-माण तालुका जनसंघर्ष समितीची मागणी
1

वडूजलाच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व्हावं; खटाव-माण तालुका जनसंघर्ष समितीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.