राहुल गांधींच्या लोकसभेतील भाषणावर, अर्थमंत्री तोंड झाकून हसल्या; वाचा... नेमकं काय घडलं!
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज (ता.२९) केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले. शेतकऱ्यांसह विविध मुद्द्यांवर सरकारला त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाब विचारला. अशातच यावेळीचा अर्थसंकल्प सादर करताना, झालेल्या पारंपारिक हलवा समारंभावर देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला. विशेष म्हणजे राहुल गांधी लोकसभेत फोटोसह हलवा समारंभाच्या मुद्दयावर बोलत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून, मनमोकळेपणाने हसल्या. त्यांची राहुल गांधी यांच्या भाषणावरील ही रिऍक्शन सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
यंदा अर्थमंत्रालयात दरवर्षीप्रमाणे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पारंपारिक हलवा समारंभ पार पडला. मात्र, यात देशातील ७३ टक्के जनतेचा समावेश नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. अर्थात राहुल गांधी या संभारंभाला जातीयवादाशी जोडल्याने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या चेहऱ्यावर दोन्ही हात ठेऊन, त्या खूप हसल्यात. ज्यामुळे निर्मला सीतारामन यांची ही रिऍक्शन सध्या सोशल माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे.
नेमका काय आरोप केलाय राहुल गांधी यांनी?
सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. ज्यात अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी पार पडलेल्या पारंपारिक हलवा समारंभावर राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. लोकसभेत पारंपारिक हलवा समारंभाचे पोस्टर दाखवत राहुल गांधी यांनी देशातील ७३ टक्के जनतेचा त्यात समावेश नसल्याचा आरोप केला. तसेच भारताचा अर्थसंकल्प तयार करण्याचे काम महत्वाच्या २० अधिकाऱ्यांनी केले आहे. मात्र, या 20 अधिकाऱ्यांपैकी केवळ एक अल्पसंख्याक आणि एक ओबीसी अधिकारी असल्याचे त्यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे.
#WATCH | In Lok Sabha, LoP Rahul Gandhi shows a poster of the traditional Halwa ceremony, held at the Ministry of Finance before the Budget session.
He says, “Budget ka halwa’ is being distributed in this photo. I can’t see one OBC or tribal or a Dalit officer in this. Desh ka… pic.twitter.com/BiFRB0VTk3
— ANI (@ANI) July 29, 2024
का हसू आले निर्मला सीतारामन यांना?
परिणामी, राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याने, अर्थमंत्री आश्चर्यचकित झाल्या. त्यांना त्यांच्या या जातीयवादी विधानावर हसू आले. ज्यामुळे निर्मला सीतारामन यांनी आपला चेहरा दोन्ही हातांनी झाकून घेतला. यावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे बोट दाखवत म्हणाले, “अर्थमंत्री हसत आहेत, हे आश्चर्यकारक आहे. ही काही हसण्याची बाब नाही, मॅडम.”