मुकेश अंबानींच्या अँटीलिआ हाऊसपेक्षाही मोठ्या घरात राहते 'ही' भारतीय महिला, वाचा... तिचे नाव?
गुजरातमधील भव्य लक्ष्मी विलास पॅलेस हा बडोद्याचे प्रसिद्ध राजघराणे असलेल्या गायकवाड कुटुंबाच्या मालकीचा आहे. गायकवाड कुटुंबाचे वंशज समरजितसिंह गायकवाड हे सध्या या पॅलेसमध्ये राहतात. समरजितसिंह गायकवाड यांचा विवाह वांकानेर राजघराण्यातील राधिका राजे गायकवाड यांच्याशी झाला आहे. ब्रिटनच्या प्रसिद्ध बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही लक्ष्मी विलास पॅलेस हे आकाराने मोठे आहे. तर प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईच्या अल्टामाउंट रोडवर स्थित असलेलया अँटीलिआ हाऊसपेक्षा देखील हे घर मोठे आहे.
किती भागामध्ये विस्तारालाय लक्ष्मी विलास पॅलेस?
लक्ष्मी विलास पॅलेस हा गायकवाड कुटुंबीयांचा वडिलोपार्जित ठेवा असून, ज्यात त्यांच्या अनेक पिढ्यांनी वास्तव केले आहे. हाउसिंग डॉट कॉम या प्रसिद्ध घरविक्री साईटच्या माहितीनुसार, लक्ष्मी विलास पॅलेस 3,04,92,000 स्क्वेअर फूटमध्ये विस्तारलेला आहे. तर जगातील सर्वात महागडे घर असलेल्या ब्रिटनच्या बकिंगहॅम पॅलेसचा विस्तार हा केवळ 8,28,821 स्क्वेअर फूट इतका आहे. तर जगातील सर्वात महागड्या घरांच्या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या मुकेश अंबानी यांचे अँटिलिया हे आलिशान केवळ 48,780 स्क्वेअर फूट आकाराचे आहे. ज्याची किंमत सुमारे 15,000 कोटी रुपये इतकी आहे.
हेही वाचा : किती संपत्तीची मालकीण आहे मनू भाकेर? जिने भारतासाठी जिंकलंय ऑलिम्पिकमध्ये पदक!
लक्ष्मी विलास पॅलेसच्या आहेत 170 खोल्या
याउलट लक्ष्मी विलास पॅलेस हा 3,04,92,000 स्क्वेअर फूटमध्ये विस्तारलेला असून, ज्याच्या 170 हून अधिक खोल्या आहेत. हा लक्ष्मी विलास पॅलेस महाराजा सयाजीराव गायकवाड ३ यांनी 1890 मध्ये बांधला होता. ज्याची किंमत सुमारे दीड लाख पौंड (जीबीपी 180,000) होती. दरम्यान, राधिका राजे गायकवाड यांनी दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. 2002 मध्ये महाराजा समरजित सिंग गायकवाड यांच्याशी त्यांचे लग्न झाले होते.
जगल्यात सर्वसाधारण जीवन
राधिका राजे यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे की, तिचा जन्म राजघराण्यात झाला असला तरी दिल्लीतील तिचे आयुष्य अतिशय सामान्य होते. राधिका राजे स्कूल बसने शाळेत जात असे. ह्युमन ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत बडोद्याच्या महाराणी म्हणाल्या, “आम्ही खूप साधे जीवन जगलो, त्यामुळे जेव्हा मी उन्हाळ्याच्या सुट्टीत वांकानेरला जायचे, तेव्हा लोकांचे माझ्याकडे पाहणे पाहून मला खूप आश्चर्य वाटायचे.”