Australian captain Alyssa Healy T-20 World Cup 2024 will not play in Bangaldesh
Australian Captain Alyssa Healy Refused to Play T20 World Cup 2024 in Bangladesh : ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची कर्णधार ॲलिसा हिलीने बांगलादेशच्या भूमिकेवर स्पष्ट भूमिका घेत बांगलादेशमध्ये वर्ल्ड कप खेळण्यास थेटच नकार दिला आहे. तेथील राजकीय, सामाजिक परिस्थितीला नजरेआड करून आपण तेथे खेळणे हे मानवतेला धरून नसल्याचे मत तिने मांडजले आहे. ऑक्टोबरमध्ये बांगलादेशमध्ये महिला टी-20 विश्वचषक खेळणे कदाचित योग्य होणार नाही. कारण त्यामुळे देशावर खूप दबाव येईल. हिलीचा असा विश्वास आहे की बांगलादेशदेखील मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि निषेधांमधून सावरत आहे.ज्यामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीनांनी काढला पळ
देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन भारतात पळ काढला होता, तर नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांना अंतरिम सरकारचे प्रमुख करण्यात आले आहे. बांगलादेशमध्ये ३ ते १९ ऑक्टोबरदरम्यान महिला टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार असून, यामध्ये गतविजेत्या ऑस्ट्रेलियासह १० संघ सहभागी होणार आहेत.
काय म्हटली ऑस्ट्रेलियाची कर्णधार
ॲलिसाने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सांगितले की, मला यावेळी तिथे खेळण्याचा विचार करणे कठीण जात आहे. एक माणूस म्हणून मला वाटते की असे करणे चुकीचे असेल. कारण ज्याप्रकारचे वातावरण तिथे आहे त्यानुसार तेथील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत भयावह आहे. त्यामुळे तिथे खेळणे हे माणुसकीला धरून नाही. पुढे जाऊन ती म्हणाली की, हे अशा देशाची संसाधने हिसकावून घेणार आहे जो खूप संघर्ष करत आहे. जे मरत आहेत त्यांना मदत करण्यासाठी त्यांना प्रत्येकाची गरज आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद घेणार अंतिम निर्णय
ॲलिसा म्हणाली की, अंतिम निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने घ्यायचा आहे. जो या आठवड्यात निर्णय घेईल. ती म्हणाली, ‘या क्षणी बांगलादेशमध्ये क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यापेक्षाही महत्त्वाच्या गोष्टी आहेत… पण यावर काम करणे मी आयसीसीवर सोडते.’ ऑस्ट्रेलियाने अलीकडेच बांगलादेशमध्ये मर्यादित षटकांची मालिका खेळली ज्यामध्ये सर्व सहा सामने – तीन एकदिवसीय सामने आणि तितके T20 सामने
ढाका येथील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर सामने
2014 च्या T20 विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियाचा बांगलादेशचा हा पहिला दौरा होता आणि देशातील T20 विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी तो महत्त्वाचा होता. हीलीला खात्री आहे की ही स्पर्धा इतरत्र हलवली तरी संपूर्ण सराव व्यर्थ जाणार नाही. ऑस्ट्रेलियाने मार्च-एप्रिलमध्ये बांगलादेशविरुद्धचे सर्व सहा सामने जिंकले.