Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG vs WI, T20 World Cup 2026 : रदरफोर्डसमोर इंग्लंडचे गोलंदाज हतबल! वेस्ट इंडिजचे इंग्लिश संघासमोर 197 धावांचे लक्ष्य 

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज १५ वा सामना इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळला जात आहे. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडसमोर १९७ धावांचे लक्ष्य उभे केले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 11, 2026 | 09:40 PM
ENG vs WI, T20 World Cup 2026: England bowlers desperate against Rutherford! West Indies set England a target of 197 runs

ENG vs WI, T20 World Cup 2026: England bowlers desperate against Rutherford! West Indies set England a target of 197 runs

Follow Us
Close
Follow Us:

ENG vs WI, T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज १५ वा सामना मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात टॉस गमावणाऱ्या वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करत शेरफेन रदरफोर्डच्या अर्धशतकाच्या जोरावर ६ गडी गमावून १९६ धावा उभ्या केल्या आहेत. या सामन्यात  शेरफेन रदरफोर्ड आणि जेसन होल्डर यांच्या समोर आदिल रशीद वगळता इंग्लंडची गोलंदाजी हतबल दिसून आली. इंग्लंडला हा सामना जिंकायचा असेल तर १९७ धावा कराव्या लागणार आहेत. इंग्लंडकडून आदिल रशीदने २ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा : IND vs NAM, T20 World Cup Live Streaming : भारत विरुद्ध नामिबिया सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह पाहाल? वाचा सविस्तर

मुंबई येथील वानखेडे स्टेडियवर(आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६) खेळला जात असलेल्या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर वेस्ट इंडिज संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्री करण्यात आले. वेस्ट इंडिज संघाची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच ओव्हरमध्ये संघाला ब्रँडन किंगच्या रूपाने पहिला झटका बसला. तर त्याच्या पुढच्या ओव्हरमध्ये कर्णधार शाई होप भोपळा न फोडताच बाद झाला. ८ धावसंख्येवर वेस्ट इंडिजने आपले दोन्ही सलामीवीर गमावले.

त्यानंतर मात्र  शिमरॉन हेटमायर आणि रोस्टन चेस दोघांनी डाव सावरला. या दोघांनी ४७ धावांची भागीदारी रचली. शिमरॉन हेटमायर २३ धावा करून बाद झाला. तर त्यानंतर  रोस्टन चेस देखील ३४ धावा करून माघारी गेला. या सेट फलंदाजांच्या माघारी जाण्याने संघ अडचणीत आला. परंतु, तेव्हा शेरफेन रदरफोर्डचे वादळ मैदानावर आले त्याने शानदार फटकेबाजी करायला सुरुवात केली. त्याला रोवमन पॉवेल(१४ धावा) साथ दिली. पॉवेल बाद झाल्यावर आलेल्या जेसन होल्डरने देखीळ इंग्लंडच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला.

Sherfane Rutherford’s half-century fires up the West Indies at Wankhede 👊 It is one of our @marriottbonvoy Milestones of the day. pic.twitter.com/IwMj3xQ5Y2 — ICC (@ICC) February 11, 2026

रदरफोर्ड आणि होल्डर यांनी ५३ धावांची भागीदारी रचली आणि वेस्ट इंडिज संघाला सन्मानजनक धावसंख्येकडे पोहचवले. होल्डरने १७ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ३३ धावा फटकावल्या आणि तो बाद झाला. त्यानंतर शेरफेन रदरफोर्डने अंतिम ओव्हरपर्यंत नाबाद राहून संघाला १९६ पर्यंत पोहचवले. तो ४२ चेंडूत ७६ धावांची खेळी करून नाबाद राहिला. त्याने या खेळीत २ चौकार आणि ७ षटकार मारले. तर रोमारियो शेफर्ड १ धावा काढून नाबाद राहिला. आदिल रशीद आणि जेमी ओव्हरटन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर सॅम करन आणि जोफ्रा आर्चर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन: ब्रँडन किंग, शाई होप (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोस्टन चेस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, अकिल होसेन, गुडाकेश मोती, शमार जोसेफ

इंग्लंड  प्लेइंग इलेव्हन: फिलिप साल्ट, जोस बटलर (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बॅंटन, हॅरी ब्रूक (कर्णधार), सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद

हेही वाचा : ICC T20 Rankings : ICC टी-20 क्रमवारीत पाकच्या साहिबजादा फरहानचा धुमाकूळ! अभिषेक-वरुण जोडीचे पहिले स्थान शाबूत

Web Title: Eng vs wi t20 world cup 2026 rutherfords half century sets west indies target of 197 runs for england

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 08:47 PM

Topics:  

  • ENG vs WI
  • ICC
  • T20 cricket
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

IND vs NAM, T20 World Cup Live Streaming : भारत विरुद्ध नामिबिया सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह पाहाल? वाचा सविस्तर 
1

IND vs NAM, T20 World Cup Live Streaming : भारत विरुद्ध नामिबिया सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह पाहाल? वाचा सविस्तर 

ICC T20 Rankings : ICC टी-20 क्रमवारीत पाकच्या साहिबजादा फरहानचा धुमाकूळ! अभिषेक-वरुण जोडीचे पहिले स्थान शाबूत  
2

ICC T20 Rankings : ICC टी-20 क्रमवारीत पाकच्या साहिबजादा फरहानचा धुमाकूळ! अभिषेक-वरुण जोडीचे पहिले स्थान शाबूत  

Abhishek Sharma Health Update: भारतासाठी दिलासादायक बातमी! अभिषेक शर्माला रुग्णालयातून डिस्चार्ज; पुढच्या सामन्यात संधी मिळणार?
3

Abhishek Sharma Health Update: भारतासाठी दिलासादायक बातमी! अभिषेक शर्माला रुग्णालयातून डिस्चार्ज; पुढच्या सामन्यात संधी मिळणार?

ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात घमासान! गोऱ्यांनी TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय 
4

ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात घमासान! गोऱ्यांनी TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.