Bangladesh Team for Asia Cup 2025: बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (Bangladesh) युएईमध्ये होणाऱ्या आशिया कप २०२५ साठी (Asia Cup 2025) आपला १६ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघाचं नेतृत्व युवा यष्टिरक्षक-फलंदाज लिटन दास (Liton Das) करणार आहे. आशिया कप सुरू होण्यापूर्वी बांगलादेश संघ नेदरलँड्सविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे.
आशिया कप २०२५ साठी जाहीर झालेल्या १६ सदस्यीय संघात सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे ३१ वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाज काझी नुरुल हसन सोहन याचं पुनरागमन. सोहनने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना २०२२ च्या विश्वचषकात खेळला होता. त्यानंतर त्याला संघात स्थान मिळालं नव्हतं. याशिवाय, बांगलादेशचा माजी कर्णधार नझमुल हुसेन शांतो याला संघातून वगळण्यात आलं आहे, तर अनुभवी अष्टपैलू मेहदी हसन मिराज ला राखीव खेळाडूंच्या यादीत ठेवण्यात आलं आहे. गोलंदाजीची मुख्य जबाबदारी मुस्तफिजूर रहमान आणि तस्किन अहमद यांच्या खांद्यावर असेल.
🔙 Nurul Hasan, whose last T20I was in 2022, gets a recall
❌ Mehidy Hasan Miraz can’t find a place; named as a stand-by #AsiaCup pic.twitter.com/LPMmHUMsWI— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 22, 2025
लिटन दास (कर्णधार), तन्जीद हसन, परवेझ हुसेन इमोन, सैफ हसन, तौहीद हृदयॉय, जाकेर अली, शमीम हुसेन, काझी नुरुल हसन सोहन, शाक मेहेदी हसन, रिशाद हुसेन, नसुम अहमद, मुस्तफिजूर रहमान, तंजीम हसन साकिब, तस्किन अहमद, शोरीफुल इस्लाम, शैफ उद्दीन.
राखीव खेळाडू – सौम्या सरकार, मेहदी हसन मिराज, तन्वीर इस्लाम, हसन महमूद.
बांगलादेशला ग्रुप-ब मध्ये स्थान मिळालं आहे. या ग्रुपमध्ये त्यांच्यासोबत अफगाणिस्तान, हाँगकाँग आणि श्रीलंका हे संघ आहेत.
११ सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग
१३ सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
१६ सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान