AUS vs SA Match : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण अफ्रिका सामना पावसामुळे रद्द, आता ग्रुप बी मध्ये सेमीफायनलची स्पर्धा रंजक मोडवर
AUS vs SA Match Abandoned Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीतील सातवा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात रावळपिंडी येथे खेळवला जाणार होता. परंतु, खराब हवामान आणि सततच्या पावसामुळे सामना रद्द घोषित करण्यात आला आहे. हवामान इतके खराब होते की दोन्ही संघांचे कर्णधार टॉससाठीही बाहेर आले नाहीत. या ‘मोठ्या लढाई’मध्ये खूप धावा अपेक्षित होत्या, परंतु, दोन्ही संघांना हवामानाचा फटका सहन करावा लागला. या बरोबरीमुळे, आता दोन्ही संघांना गट ‘ब’मध्ये प्रत्येकी एक गुण देण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण अफ्रिका सामना रद्द
It's a shame that the Rawalpindi ground isn't fully covered. Such an important match – SA vs Aus – might go down the drain because no one addressed this issue. Was the ICC money utilised wisely by hosts? pic.twitter.com/nPwthd1fji
— Mohammad Kaif (@MohammadKaif) February 25, 2025
ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामना खूप महत्त्वाचा
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना उपांत्य फेरीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा होता. या सामन्यात जिंकणारा संघ उपांत्य फेरीत जवळजवळ स्थान निश्चित करू शकला असता. पण, या सामन्याचा ड्रॉ इंग्लंड आणि अफगाणिस्तानसाठी आनंदाची बातमी म्हणता येईल कारण या दोघांसाठीही उपांत्य फेरीत पोहोचण्याचे दरवाजे उघडले आहेत.
ग्रुप बी मध्ये सेमीफायनलची स्पर्धा रंजक
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया आता गट ब मध्ये प्रत्येकी तीन गुणांसह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियाला अजूनही अफगाणिस्तानविरुद्ध एक सामना खेळायचा आहे, तो जिंकून कांगारू संघ थेट उपांत्य फेरीत प्रवेश करणार आहे. जर अफगाण संघ इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान सामना हरला तर तो स्पर्धेतून बाहेर पडेल.
इंग्लडचा संघ अफगाणिस्तानला हरवण्यात यशस्वी
अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवले तर. त्याच वेळी, इंग्लिश संघ अफगाणिस्तानला हरवण्यात यशस्वी होतो. अशा परिस्थितीत, ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेने कोणत्याही परिस्थितीत इंग्लंडवर विजय मिळवावा अशी इच्छा करावी लागेल. ग्रुप अ मधील सेमीफायनल संघ आधीच जाहीर झाले आहेत. भारत आणि न्यूझीलंड अंतिम-४ मध्ये पोहोचले आहेत, तर पाकिस्तान आणि बांगलादेश बाहेर पडले आहेत.