नाशिक : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. दौऱ्यावर असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्री गिरीश महाजनांसोबत पदाधिकाऱ्यांसह राम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यामांशी संवाद साधला. दरम्यान, 22 जानेवारीला उद्धव ठाकरेंनी नाशिकला जाऊन राम मंदिराचे दर्शन घेण्याचे जाहीर केल्यानंतर बावनकुळेंचा नाशिक दौरा त्यांच्यावर कुरघोडी असल्याचे बोलले जात होते, या दाव्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी खंडन केले आहे.
राम मंदिराचे दर्शनानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधत, याचे कोणीही राजकारण करू नये. आम्ही प्रभू रामचंद्रांचे भक्त आहोत. आम्ही प्रभू श्रीरामाचे दर्शन घेत, शेतकऱ्यांना चांगले दिवस येवो, महाराष्ट्रातील दुष्काळ नष्ट व्हावा, अशी प्रार्थना केली. सर्वांचे मंगल व्हावे यासाठी आम्ही प्रभू रामचंद्राची प्रार्थना केली. आम्हाला येथे येऊन चांगले बळ मिळाल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
जे राजकारण करतील त्यांना लखलाभ
आम्ही सर्वांनी मिळून प्रभू रामचंद्राचे दर्शन घेतले आहे. महाराष्ट्रात सर्व मंगल होण्यासाठी आम्ही एकत्रित प्रार्थना केल्याचे त्यांनी म्हटले. मंत्री गिरीश महाजन, भारती पवार यांच्यासह आम्ही सर्वांनी रामाचे दर्शन घेतले.
आम्हाला मोदींची गॅरंटी
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी राम मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर ही उद्धव ठाकरेंवर कुरघोडी असल्याचे बोललते जात होते. परंतु, त्यांनी यांचे खंडन करीत आम्हाला याच्यावर राजकारण करण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त केले. तसेच, आम्हाला मोदींची गॅरंटी आहे. त्यामुळे आम्हाला याचे राजकारण करण्याची गरज नसल्याचे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
Web Title: Chandrasekhar bawankule said ram temple worship should not be associated with politics those who will do politics are lucky nryb