मुंबई : लाखों नागरीकांचा देवदूत असलेल्या अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) रशिया आणि युक्रेनच्या युध्दात अडकलेल्या भारतीय नागरीकांच्या सुटकेबाबत चिंता व्यक्त करत एक ट्विट केलं आहे.
युक्रेनमध्ये विद्यार्थी आणि कुटुंब मिळून 18 हजार भारतीय नागरिक अ़डकले आहेत. या भारतीयांना परत आणण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे, याची खात्री आहे. मी भारतीय परराष्ट्र खात्याला विनंती करतो की, पर्यायी मार्ग शोधावा. या सर्वांच्या सुरक्षेसाठी देवाला प्रार्थना… असे ट्विट सोनूने केले आहे.
रशिया आणि युक्रेनच्या (Russia And Ukraine युध्दात काही ठिकाणी बॉम्बहल्ले देखील केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर युक्रेनकडून प्रवासी विमानांच्या उड्डाणाला बंदी घालण्यात आली आहे. रशिया आणि युक्रेनमधील या युद्धजन्य परिस्थितीत 20 हजार भारतीय नागरिक अडकले आहेत. या नागरिकांची काळीज भारतासह महाराष्ट्राला आहे. त्यासोबतच, सोनू सूदला देखील आहे. त्यामुळे सोनू आता तिथे अडकलेल्या भारतीयांसाठी आणखी काय काय करतो ? तो पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या देशबांधवांना परत आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार का ? याची उत्सुकता लागून राहिली आहे.