नागपूर (Nagpur). नागपुरकरांच्या विशाल मनाचा (vast mind) पुन्हा एकदा अनुभव आला आहे. व्यवसायाने फोटो स्टुडिओ मालक असलेल्या दिनेश यांचे ब्रेन स्ट्रोकमुळे (brain stroke) निधन झाले. मात्र दुःखात बुडालेल्या दिनेशच्या कुटुंबीयांनी दिनेशचे अवयव दान करण्याचा निर्णय (to donate his organs) घेतला. यामुळे अवयव निकामी झालेले अणि मृत्यूच्या दारात उभे असलेल्या चौघांना जीवनदान मिळाले. इतकेच काय तर उपराजधानीतील अवयव प्रत्यारोपणची चळवळ (the organ transplant movement) पुन्हा एकदा वेग पकडू लागली आहे.
[read_also content=”प्रयत्नांती परमेश्वर! कोरडवाहू नदी ‘या’ प्रयत्नानंतर तुडूंब भरून वाहू लागली; पाणीटंचाईचा प्रश्न लागला मार्गी https://www.navarashtra.com/latest-news/the-arid-river-began-to-overflow-after-the-this-effort-there-was-a-problem-of-water-scarcity-nrat-141421.html “]
दिनेश सोनावणे यांच्या अवयव दानात उपलब्ध झालेले हृदय मुंबईतील कोकीळाबेन रुग्णालयाकडे तर यकृत नागपुरातील मेडिट्रिना रुग्णालयात आणि दोन मूत्रपिंडांपैकी एक वर्धा येथील सावंगी मेघे येथे तर दुसरी नागपुरातील दुसरी न्यू इरा रुग्णालयात ग्रीन कॉरिडॉरमार्फत पोहचवत प्रत्योरीपत करण्यात आलं.
कोरोनाच्या दुस-या लाटेतून बाहेर आल्यानंतर नागपुरातील हे पहिलं यशस्वी अवयव दान आहे. याकरता दोन ग्रीन कॅरिरेडोअर बनवण्यात आले होते. पहिल्या ग्रीन कॅरिडोअरमध्ये मुंबईकरता मेडिट्रीना ते नागपूर विमानतळापर्यंतचा ग्रीन कॅरिडोअर होता. त्याअंतर्गत हे अंतर 4 मिनिटात नागपूरात पूर्ण झालं. तर नागपूर ते वर्धा असं दुसर ग्रीन कॅरिडोअर कऱण्यात आलं. या वर्षातील हे पाचवे अवयव दान आहे.