|
मुंबई: शकुन बत्रा दिग्दर्शित ‘गेहराईया’ सिनेमा या 11 फ्रेब्रुवारीला रिलीज होत आहे. या सिनेमातून दीपिका पदुकोण (Deepika Padukon) गंभीर भूमिकेतून आपल्यासमोर येत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने दीपिका पदुकोणने ‘नवराष्ट्र’शी केलेली ही खास बातचीत. ‘गेहराईया’ (gehraiyaan)ही खूपच वास्तवदर्शी फिल्म आहे. खूप वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये अशाप्रकारची फिल्म येत आहे. ज्यात सगळे कॅरेक्टर्स रिअल आहेत. हा सिनेमा टिपीकल बॉलीवूड सिनेमांपेक्षा खूपच वेगळा सिनेमा आहे. मानवी नातेसंबंधाचे अनेक पैलू आज आपण आपल्या समाजामध्ये पाहतो. पण अशा नातेसंबंधाचा समाजाने स्विकार केला नाही. अशा विषयांवर चित्रपट बनवले पाहिजेत. पण आपल्याकडे असे फिल्मस बनले जात नाहीत. नात्यांमधली गुंतागुंत, ‘मानवी भावभावनांचं अनोखं विश्व’ असंही एक जग आहे. त्याच्यावरच हा सिनेमा भाष्य करतो.तसंच गेली पंधरावर्षे मी या इंडस्ट्रीमध्ये काम करते आहे. मला नेहमीच शकुन बत्रा (Shakun Batra) यांच्यासह काम करायचं होतं. ते खूपच वास्ववादी फिल्मस बनवतात. त्यांच्या सिनेमांची मी खूप मोठी चाहती आहे आणि या सिनेमातूनही नात्यांचा एक वेगळा पैलू ते घेऊन येत आहेत. माझे आधीचे ‘पिकू’ (Pikoo)आणि ‘तमाशा’ (Tamasha)हे दोन्ही फिल्मस भावनिकरुपामध्ये खूपच गंभीर सिनेमे होते आणि ‘गेहराईया’ हा सिनेमा या दोन्ही सिनेमापेक्षा भावनिक नातेसंबंधामध्ये एक पाऊल पुढे घेऊन जाणारा सिनेमा आहे आणि मला स्वत:ला वास्वतदर्शी फिल्मस करायला आणि पाहायला खूप आवडतात. त्यामुळे मी या सिनेमाबाबत खूपच उत्सुक आहे. प्रोमो पाहून रणवीर सिंगची (Ranvir singh) प्रतिक्रिया अलिशा आणि दीपिकामध्ये किती साम्य आहे? सिध्दांत चतुर्वेदी आणि दीपिकाची केमेस्ट्री मी स्वत:ला सिनिअर अभिनेत्री नाही मानत स्टारडम आणि दीपिका नातेसंबंध आणि दीपिका |