(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
बॉलिवूडची सर्वात आवडती जोड्या म्हणून ओळखली जाणारी रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र दिसले आहेत. जेव्हा या दोघांनी स्क्रीनवर एकत्र काम केले तेव्हा प्रेक्षकांना त्यांची जोडी खूप आवडली आणि चित्रपटही हिट झाले. आता हे दोघे पुन्हा एकत्र दिसल्याने चाहत्यांमध्ये या जोडीनं पुढील चित्रपटात एकत्र येण्याची आशा वाढली आहे.
एकत्र दिसले रणबीर-दीपिका
शनिवारी सकाळी अभिनेत्री मुंबई एअरपोर्टवर स्टायलिश लूकमध्ये दिसली. विशेष म्हणजे,त्याचवेळी रणबीर कपूर देखील डॅशिंग लूकमध्ये एअरपोर्टवर दिसला. दोघांचेही व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.या वेळी रणबीर ब्लॅक रंगाची हुडी, कार्गो जीन्स आणि कॅप घातलेले दिसत होते.या लूकमध्ये होत खूपच डॅशिंग दिसत हातो. यावेळी त्याने त्याने पापाराझींना अभिवादनही केले.रणबीर कपूरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.तर चाहते त्याच्या लूकचे कौतुक करत आहेत.
तर दीपिकाने ग्रे रंगाचा को-ऑर्ड सेट घातला होता, ज्यामध्ये झिप-अप कॉलर जॅकेट आणि रुंद पायांची पिनस्ट्राइप ट्राउझर होती. तिने हा लूक मोठे काळे सनग्लासेस, छोटे इअररिंग्स आणि स्लीक बनसह पूर्ण केला होता. दीपिकाचा हा लूक चाहत्यांना खूप आवडत आहे आणि तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Vijay-Rashmika Engagement: विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाचा गुपचूप साखरपुडा!
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमात महेश मांजरेकर साकारणार कधीही न साकारलेली भूमिका… जोरदार चर्चा!
दोघांचे हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर यांनी एकमेकांना मिठीही मारली. दोघेही एकाच कार्टमध्ये बसलेले असतानाचे त्यांचे व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल होत आहेत.काही वर्षांपूर्वी रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण रिलेशनशीपमध्ये होते, पण नंतर त्यांचा ब्रेकअप झाला, मात्र ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच रणबीर कपूर आणि दीपिकाला एकत्र एअरपोर्टवर पाहण्यात आले. दोघांना एकत्र पाहून त्यांचे चाहतेही आनंदी झाल्याचे पाहायला मिळत आहे.