मी CM पदाच्या शर्यतीत नाही, पण...; विधानसभा निवडणुकीच्या मतदानाआघी एकनाथ शिंदेंचं मोठं विधान
वर्धा : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. वर्धा येथे ते विविध कल्याणकारी योजनांचा शुभारंभ करणार आहेत. ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित आहेत. मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींबाबत गौरोद्गार काढले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वात देशाचा विकास झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेदेखील वाचा : ‘एक देश, एक निवडणुकी’चा प्रस्ताव मंजुर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली प्रतिक्रिया
पंतप्रधान मोदींनी यापूर्वी 30 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचा दौरा केला होता. तेव्हा 76 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर आज पुन्हा ते महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान मोदी वर्ध्यातील विश्वकर्मा कार्यक्रमाला उपस्थित आहेत. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘पंतप्रधान मोदींनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. मोदींच्या नेतृत्त्वात देशाचा विकास होत आहे. पण काही लोक परदेशात जाऊन देशाची बदनामी करत आहेत’. तसेच आरक्षाबाबबतही त्यांनी मोठं विधान केलं आहे. ‘आरक्षण कोणीही संपवू शकत नाही’, असे ते म्हणाले.
स्टार्टअप योजनेचाही शुभारंभ करणार
पंतप्रधान मोदी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ करतील. या योजनेअंतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात महाराष्ट्रातील महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना मदत केली जाईल. या योजनेअंतर्गत 25 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाणार असल्याची माहिती दिली जात आहे.
15 ते 45 वयोगटातील तरुणांना प्रशिक्षण
अहिल्याबाई होळकर महिला स्टार्ट-अप योजनेचा शुभारंभ देखील केला जाणार आहे. पंतप्रधान मोदी महाराष्ट्र सरकारच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचा शुभारंभ करतील. याद्वारे 15 ते 45 वयोगटातील तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ते स्वावलंबी बनू शकतील. राज्यातील सुमारे दीड लाख तरुणांना दरवर्षी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण मिळणार आहे.