सिल्लोड : तालुक्यातील कोटनांद्रा येथील एका भाविकाचा अयोध्या येथे श्री प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी जात असताना वाटेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना अयोध्येपासून 90 किमी अंतरावर घडली.
साहेबराव बंडू राकडे (वय ५५) असे मृत भाविकाचे नाव असून, अयोध्या 90 किमीवर असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. गावातील 50 ग्रामस्थ ट्रॅव्हलने अयोध्या येथील श्री प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी जात होते. अयोध्या 90 किमी असताना मयत साहेबराव राकडे यांची प्रकृती बिघडली व त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला.
शोकाकुल वातावणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. दरम्यान, वाटेतच मृत्यू झाल्याने अयोध्येतील राम मंदिराचे दर्शनाचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. मयत साहेबराव राकडे हे भूमिहीन होते. बांधकाम व्यवसाय करुण कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असे.
घरची परिस्थिती जेमतेम असल्याने अयोध्येहून मृतदेह रुगणवाहिकेतून आणण्यासाठी मोठा खर्च होता. मात्र अशा वेळी ग्रामस्थांनी एकजुटता दाखवत मदतीला धावले व सर्व खर्चाची जबाबदारी घेतली.