Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : वाईत ‘पारदर्शक कारभार’ की कागदोपत्री स्वच्छता? ब्राह्मणशाहीत गटारे तुंबून रस्त्यावर सांडपाणी

अनेक दिवस गटारांची प्रत्यक्ष साफसफाई न झाल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. दोन महिन्यांपूर्वी साफसफाई केल्याचा दावा करण्यात आला होता; मात्र नागरिकांच्या मते ती साफसफाई केवळ कागदोपत्रीच झाली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 04, 2026 | 05:45 PM
वाईत ‘पारदर्शक कारभार’ की कागदोपत्री स्वच्छता? ब्राह्मणशाहीत गटारे तुंबून रस्त्यावर सांडपाणी

वाईत ‘पारदर्शक कारभार’ की कागदोपत्री स्वच्छता? ब्राह्मणशाहीत गटारे तुंबून रस्त्यावर सांडपाणी

Follow Us
Follow Us:

वाई : वाई शहरातील नुकतीच पार पडलेली नगराध्यक्ष निवडणूक अटीतटीची आणि चुरशीची ठरली. वाईकर नागरिकांना अपेक्षा होती की नव्या नेतृत्वाखाली शहरात स्वच्छता आणि सुशासनाचा नवा अध्याय सुरू होईल. मात्र आज वास्तव पूर्णतः वेगळे असल्याचे चित्र शहरात उघड झाले आहे. ब्राह्मणशाही परिसरात ग्रामीण रुग्णालय ते किसनवीर चौक आणि गुलाबराव खामकर पथ या मार्गावर गटारे तुंबून सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहताना दिसत आहे.

PM-USHA Scheme: पीएम-उषा योजनेचा ‘बूस्टर’! अनुसूचित जाती उपघटकासाठी १७ लाखांचा निधी वाटप

अनेक दिवस गटारांची प्रत्यक्ष साफसफाई न झाल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. दोन महिन्यांपूर्वी साफसफाई केल्याचा दावा करण्यात आला होता; मात्र नागरिकांच्या मते ती साफसफाई केवळ कागदोपत्रीच झाली. गटारांमध्ये वाळूचे ढीग साचलेले असून प्लास्टिकच्या बाटल्या व इतर कचऱ्यामुळे नाले पूर्णपणे चोकअप होत आहेत. परिणामी दोन-तीन दिवसांतून कधीही गटाराचे पाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर सांडते. दुर्गंधी पसरत असून डासांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर प्रकाराकडे वाई नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. विविध प्रभागांतून निवडून आलेल्या नगरसेवकांचेही याकडे लक्ष नसल्याची चर्चा आहे. किसनवीर कॉलेज रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात.

शहरातील अनेक भागांत “रस्त्यात गटार की गटारात रस्ता?” अशी अवस्था झाली आहे. नवीन नगराध्यक्षांनी “पारदर्शी कारभार” करण्याचा दावा केला आहे. मात्र फक्त ऑनलाईन नगरपरिषद बैठका घेऊन शहर स्वच्छ होणार का? असा सवाल काही नागरिक दबक्या आवाजात उपस्थित करत आहेत. प्रत्यक्ष कामापेक्षा कागदोपत्री अहवालांना अधिक महत्त्व दिले जात असल्याची टीका होत आहे. तर काही ठिकाणी नळ कनेक्शन साठी मधोमध रस्ता घालून त्या ठिकाणी मातीचे ढीग तसेच लावले जातात कधीही कोठेही अपघात होऊ शकतो परंतु नगर परिषदेचे कामगार मोठ्या प्रमाणात खोदकाम करून ढिग तसेच लावतात वाई शहराची स्वच्छता ही फक्त अहवालांपुरतीच मर्यादित आहे का? “अच्छे दिन” येतील या अपेक्षेने ब्राह्मणशाही परिसरातील मत दिलेल्या नागरिकांना अजूनही दुर्गंधी, सांडपाणी आणि कचऱ्याचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने गटारांची प्रत्यक्ष साफसफाई, नियमित देखरेख आणि जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अन्यथा नागरिकांचा संताप तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाईकरांना आश्वासन नव्हे, तर कृती हवी आहे.

Shivneri ST Bus : एसटीची ‘शिवनेरी’ आता मुंबई–पुण्याच्या पलीकडे धावणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Web Title: In the satara wai transparent administration or paperwork cleanliness sewage overflowing on the streets in brahman rule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • maharashtra
  • Satara
  • Wai

संबंधित बातम्या

CM Fadnavis Birthday: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी रोजगार अन् कौशल्य विकासाचा संकल्प दृढ – मंत्री मंगल प्रभात लोढा
1

CM Fadnavis Birthday: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी रोजगार अन् कौशल्य विकासाचा संकल्प दृढ – मंत्री मंगल प्रभात लोढा

Satara News: सातारा नगरपरिषदेची उद्या सर्वसाधारण सभा; मालमत्ता कर, रस्ते दुरुस्तीसह तब्बल ४० महत्त्वाच्या विषयांवर होणार निर्णय
2

Satara News: सातारा नगरपरिषदेची उद्या सर्वसाधारण सभा; मालमत्ता कर, रस्ते दुरुस्तीसह तब्बल ४० महत्त्वाच्या विषयांवर होणार निर्णय

लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा सुरू करा; महिला काँग्रेसचा साताऱ्यात मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला निवेदन
3

लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा सुरू करा; महिला काँग्रेसचा साताऱ्यात मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला निवेदन

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई
4

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.