ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना एखाद्याचा मृत्यू झाला तर रेल्वे नुकसान भरपाई देते का? एकदा कारण जाणून घ्या
भारतात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे प्रवास पहिले कारण म्हणजे स्वस्त तिकिटे. दुसरे कारण म्हणजे त्याचा आरामदायी प्रवास, तुम्ही जनरल डब्यात किंवा एसी कोचमध्ये प्रवास करू शकत. तसेच हा एक वेगवान प्रवास देखील आहे, ज्यामुळे बहुतेक लोक ट्रेनने प्रवास करण्याला अधिक प्राधान्य देत असतात. नोकरदार वर्गांसाठी तर ट्रेनचा प्रवास त्यांच्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे.
महिला काही काळापासून रेल्वे अपघातांचे प्रमाण फार वाढले आहे. कधी रुळावरुन ट्रेन घसरल्यामुळे, तर कधी मुसळधार पावसामुळे एवढंच नाहीतर दाट धुक्यामुळे अनेक मोठमोठे रेल्वे अपघात झाल्याचे पाहायला मिळते. अनेक प्रवाशांचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशात अनेकांच्या मनात ट्रेनशी संबंधित काही प्रश्न असतात, त्यातला एक प्रश्न म्हणजे, ट्रेनचा अपघात झाला नसून ट्रेनमध्ये प्रवास करताना एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्या व्यक्तीला नुकसान भरपाई दिली जाते की नाही? तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर आम्ही या लेखात त्याचे उत्तर देत आहोत.
हेदेखील वाचा – Bhadas cafe: या कॅफेमध्ये जाऊन तुम्ही तुमचा राग मनसोक्त काढू शकता, गोष्टींची तोडफोड करू शकता
जाणून घ्या अचूक उत्तर
भारतीय रेल्वे परिवहन विभागाच्या नियमांनुसार, रेल्वेच्या आत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, भारतीय रेल्वे त्याला भरपाई देते. पण जर एखाद्या आजाराने किंवा इतर कोणत्याही कारणाने त्याचा ट्रेनमध्ये बसून मृत्यू झाला तर भारतीय रेल्वेकडून व्यक्तीला कोणतीही भरपाई दिली जात नाही.
ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना होतात अपघात
तुम्ही दररोज अशा अनेक बातम्या आणि व्हिडिओ पाहत असाल ज्यात ट्रेन पकडताना किंवा उतरताना लोक रुळाखाली येतात. यामुळे मृत्यू आणि नंतर गंभीर दुखापत होते. अशा परिस्थितीत, ही प्रवाशांची चूक मानली जाते, कारण बहुतेकदा अनेक प्रवासी ट्रेन चालू असताना ट्रेनमध्ये चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करत असतात, ज्यामुळे ते अनेकदा अपघाताचे बळी ठरतात. असे केल्यामुळे आजवर अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहे.
हेदेखील वाचा – एखाद्या जादुई दुनियेसारख्या वाटतात या गुहा, अंधारात अशा चमकतात, पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
कोणकोणत्या वेळी रेल्वेकडून भरपाई दिली जाते?