राग हा प्रत्येकालाच येतो. ही एक सामान्य गोष्ट आहे. रागावर आपले नियंत्रण राहत नाही. एकदा का आपल्याला राग आला की यावर नियंत्रण मिळवणे फार कठीण बनते. राग आल्यानंतर आपल्या आत ज्या भावना राहतात त्या व्यक्त करता येत नाहीत आणि यामुळे व्यक्ती कुडत राहतो. दुसरीकडे, जर आम्ही तुम्हाला सांगितले की, तुम्ही तुमचा राग काढण्यासाठी कॅफेमध्ये जाऊ शकता, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे.
आता तुम्ही तुमचा राग काढण्यासाठी कॅफेमध्ये जाऊ शकता. कॅफे ही खाण्याची, पिण्याची आणि मजा करण्याची जागा आहे, मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका कॅफेविषयी सांगत आहोत जिथे जाऊन तुम्ही तुमचा राग काढू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो, या कॅफेमध्ये जाऊन तुम्ही तुमचे मन हलके करू शकता. हे कॅफे कुठे आहे आणि आपला राग काढण्यासाठी इथे किती पैसे मोजावे लागतील या सर्व बाबींविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – एखाद्या जादुई दुनियेसारख्या वाटतात या गुहा, अंधारात अशा चमकतात, पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
कुठे आहे हे कॅफे?
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एक कॅफे आहे, जिथे तुम्ही कोणत्याही निर्बंधाशिवाय तुमचा राग काढू शकता. या कॅफेला ‘भडास कॅफे’ म्हणून ओळखले जाते. येथे तुम्ही मनसोक्त हवी तितकी तोडफोड करू शकता. विशेष म्हणजे याठिकाणी तोडफोड केल्यास ना तुम्हाला कोणी अडवणार आहे ना पोलिस पकडणार आहेत.
कॅफेमध्ये काढू शकता आपला राग
तथापि, कॅफेमध्ये खानपानची संपूर्ण सुविधा पुरविल्या जातात, जिथे तुम्ही तुमच्या मित्र आणि जोडीदारासोबत कॉलीटी टाईम घालवू शकता. राग काढणाऱ्यांसाठी इथे एक ‘Anger Room’ आहे, जिथे तुम्हाला चष्मा, प्लेट्स, ग्लासेस, खुर्च्या, टेबल, टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि कॉम्प्युटर यांसारख्या वस्तू मिळतील. या वस्तू तोडून तुम्ही त्यांच्यावर आपला सर्व राग काढून टाकू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो, कॅफेच्या भिंतींवर राग, द्वेष आणि ओरडणे असे शब्द मोठ्या अक्षरात लिहिलेले आहेत, जे राग बाहेर काढण्यास तुम्हाला मोटिव्हेट करतात.
मुंबईमध्येही आहे राग काढण्यासाठीचा अनोखा कॅफे
बऱ्याच वेळा काम न मिळाल्याने किंवा वैयक्तिक समस्यांमुळे मनात राग निर्माण होतो, त्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही मुंबईतील अंधेरी येथे असलेल्या “Rage Room Sakinaka” कॅफेमध्ये जाऊ शकता. येथे तुम्ही 500 रुपये देऊन काचेच्या बाटल्या, कप, टीव्ही आणि चष्मा यासह अनेक गोष्टी तोडू शकता. इथे येऊन तुम्हाला खूप मनःशांती मिळेल आणि तुमचा राग क्षणार्धात दूर होईल.
पत्ता: मेट्रो स्टेशन, 13, साकीनाका, मुंबई, महाराष्ट्र 400072
हेदेखील वाचा – एक असे फेमस टुरिस्ट डेस्टिनेशन जिथे 95 वर्षांपासून एकही मूल जन्माला आले नाही, कारण ऐकून चक्रावाल
या कॅफेमध्ये जाण्याचे नियम
तुमचा राग काढण्यासाठी या या कॅफेमध्ये जाण्यापूर्वी काही नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम, या एंगर रूममध्ये जाण्यापूर्वी, सर्व ग्राहकांना त्यांची सुरक्षा लक्षात घेऊन सेफ्टी ड्रेस आणि सेफ्टी गियर प्रदान केले जातात, जेणेकरुन कस्टमर्सना आपला राग व्यक्त करताना कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये.