Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dry Day: मद्यप्रेमींनी लक्ष द्या! सरकारचा मोठा निर्णय, सलग ३ दिवस दारू बंद; कधी आणि का?

महाराष्ट्रात स्थानिक निवडणुकांमुळे १, २ आणि ३ डिसेंबरला राज्यातील संबंधित नगरपरिषदा व नगरपंचायत क्षेत्रांत मद्यविक्री बंद राहणार आहे. बार, दारू दुकानं, बिअर शॉप्स व वाईन शॉप्स पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 30, 2025 | 12:18 PM
dry day (फोटो सौजन्य: social media)

dry day (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणूक क्षेत्रांत पूर्ण मद्यविक्री बंद
  • मतदान व मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बार-रेस्टॉरंटही बंद.
  • निवडणूक काळात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारचा निर्णय.
महाराष्ट्र: ही बातमी खास मद्यप्रेमींसाठी आहे. ग्लास रिकामाच राहण्याची शक्यता आहे. सलग तीन दिवस मद्यविक्री राज्यात बंद राहणार आहे. यामागचं कारण काय आहे आणि मद्यविक्री बंद राहण्याचे ते तीन दिवस कोणते जाणून घ्या.

कारण काय?

दारू बंदी असण्यामागचे कारण म्हणजे निवडणूक. सध्या राज्यभरात निवडणुकीचा जोर आहे. येणाऱ्या २ डिसेंबरला राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर ३ डिसेंबरला मतमोजणी आहे. त्यामुळे राज्यातील मतदानाच्या ठिकाणी तीन दिवस ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे मद्यप्रेमींचा या तीन दिवस ग्लास रिकामाच राहणार आहे.

मद्यविक्री बंद असलेले तीन दिवस कोणते?

१ डिसेंबर – मतदानापूर्वीचा दिवस
२ डिसेंबर – मतदानाचा दिवस
३ डिसेंबर – मतमोजणीचा दिवस

Mumbai Crime: ‘लग्नासाठी पैशांची गरज’… सावत्र सुनेचा भयानक कट; सीसीटीव्ही फुटेजवरून हत्येचा उलगडा, काय आहे प्रकरण?

काही ठिकाणी संपूर्ण दिवस तर…

निवडणूक असलेल्या जिल्ह्यातील संबंधित नगरपरिषदा/नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व बार अँड रेस्टॉरंट, वाईन शॉप, बिअर शॉपी, माडी विक्री, देशी, विदेशी सर्वच बंद असणार आहे. संपूर्ण तीन दिवस म्हणजेच १ डिसेंबर ते ३ डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहे. काही जिल्ह्यात मतमोजणीच्या दिवशी सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मद्यविक्री बंद राहिल. त्यानंतर मात्र काही जिल्ह्यांमध्ये मद्यविक्री सुरू होणार असल्याची माहिती आहे.

नवनीत राणांचा पराभव नेमका का झाला? रवी राणांनी थेट केला खुलासा

राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. नगर पंचायत आणि नगर परिषदांची निवडणूक होत आहे. यासाठी येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. अमरावतीमध्ये देखील प्रचाराचा धुराळा उडाला आहे. आता युवा स्वाभिमानी पक्षाचे नेते आणि आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा हे चर्चेमध्ये आले आहेत. राणा दाम्पत्याने केलेल्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा आहे. नुकतेच एका सभेमध्ये रवी राणा यांनी नवनीत राणा यांच्या पराभवाचे कारण सांगितले आहे.

आमदार रवी राणा यांची अमरावतीत नुकतीच एक प्रचार सभा पार पडली. या सभेत त्यांनी लोकसभा निवडणुकीत पत्नी नवनीत राणा यांचा झालेला पराभव यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी नवनीत राणा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये का हरल्या याचे कारण देखील सर्वांसमोर आणले. विद्यमान खासदारांची कार्यशैली आणि स्थानिक आमदारांचा विकासकामांचा अनुभव या मुद्द्यांवरून रवी राणा यांनी ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांना लक्ष्य केले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अमरावती जिल्ह्याचे काय हाल झाले, हे सर्वांना माहीत आहे, असे म्हणत आमदार रवी राणा यांनी काँग्रेसचे विद्यमान खासदार बळवंत वानखडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.

पुढे रवी राणा म्हणाले की, नवनीत राणांचा पराभव झाल्यामुळे अमरावती जिल्ह्याचे काय हाल झाले हे सर्वांना माहीत आहे. आताच्या खासदाराचा अत्ता, पत्ता नाही. विकासाचा पत्ता नाही आहे, काम करणारी महिला खासदार नवनीत राणा तुमच्या आशीर्वादाने लढत होती. पण जातीपातीच्या राजकारणामुळे तिचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवाराचा पराभव झाला आणि दारूचा दुकान असलेला व्यक्ती निवडून आला, अशा शब्दात रवी राणा यांनी टोला लगावला आहे. तसेच नवनीत राणा यांच्या पराभवाचे कारण देखील सांगितले

Harshwardhan Sapkal News: महायुतीच म्हणजे ‘पैसा फेक और तमाशा देख’ सारखे सुरू ; हर्षवर्धन सपकाळांनी तोफ डागली

💡

Frequently Asked Questions

  • Que: दारू विक्री का बंद ठेवण्यात आली आहे?

    Ans: मतदान शांततेत व्हावे आणि गोंधळ टाळण्यासाठी निवडणूक आयोगाचा आदेश.

  • Que: कोणत्या ठिकाणी दारू विक्री बंद राहणार?

    Ans: २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायत निवडणूक क्षेत्रांतच बंदी लागू राहील.

  • Que: बार आणि रेस्टॉरंटही बंद राहणार का?

    Ans: होय. बार, दारू दुकानं, बिअर शॉप्स, वाईन शॉप्स—सर्व मद्यसंबंधित व्यावसायिक सेवा बंद राहतील.

Web Title: Dry day alcohol ban for 3 consecutive days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 12:18 PM

Topics:  

  • crime
  • Liquor Ban

संबंधित बातम्या

karnatak Crime: घरात पतीचा मृतदेह पाहताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; ‘सगळं संपलं’… सुसाईड नोट सापडली
1

karnatak Crime: घरात पतीचा मृतदेह पाहताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; ‘सगळं संपलं’… सुसाईड नोट सापडली

Uttarpradesh Crime: ईदीच्या 1500 रुपयांवरून वाद; पतीने पत्नी-मुलांना विष दिले, त्यांनतर स्वतः…
2

Uttarpradesh Crime: ईदीच्या 1500 रुपयांवरून वाद; पतीने पत्नी-मुलांना विष दिले, त्यांनतर स्वतः…

Pune Crime: ‘सोडायला तयार नव्हती’ म्हणून कात्रजजवळ महिलेचा गळा आवळून हत्या; नेपाळी ‘लव्हस्टोरीचा’ भयानक शेवट
3

Pune Crime: ‘सोडायला तयार नव्हती’ म्हणून कात्रजजवळ महिलेचा गळा आवळून हत्या; नेपाळी ‘लव्हस्टोरीचा’ भयानक शेवट

Nagpur News: कामठीत शेजाऱ्यांतील वाद विकोपाला; 47 वर्षीय महिलेचा हृदयविकाराने मृत्यू
4

Nagpur News: कामठीत शेजाऱ्यांतील वाद विकोपाला; 47 वर्षीय महिलेचा हृदयविकाराने मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.