Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुजरातमध्ये कोरोनाचे चटके बसू लागले: नोकरी गेल्यानंतर आर्थिक तंगी भेडसावणाऱ्या महिला झाल्या सरोगेट मदर्स; अविवाहित युवतींनीही गर्भाशय भाड्याने दिली

संसाराचा गाडा हाकण्यासाठी महिलांनी हा मार्ग अवलंबला आहे. हैराण करणारी गोष्ट अशी आहे की, यात काही अविवाहित महिलांचाही समावेश आहे. याच्या मोबदल्यात त्यांना ३ ते ४ लाख रुपये आणि वैद्यकीय खर्च मिळतो आहे. जाणून घ्या त्यांची आपबीती...

  • By Vivek Bhor
Updated On: May 31, 2021 | 11:58 AM
गुजरातमध्ये कोरोनाचे चटके बसू लागले: नोकरी गेल्यानंतर आर्थिक तंगी भेडसावणाऱ्या महिला झाल्या सरोगेट मदर्स; अविवाहित युवतींनीही गर्भाशय भाड्याने दिली
Follow Us
Close
Follow Us:

पूर्व अहमदाबादेत एक २३ वर्षीय तरुणी घराघरांत कामासाठी जात होती, पण कामच बंद झाल्याने तिच्यासमोर संसाराचा गाडा हाकायचा कसा हा प्रश्न ‘आ’ वासून उभा ठाकला. कोणीतरी तिला सरोगेट मदर होण्याचा सल्ला दिला. तिला हा मार्ग योग्य वाटला. आता ती एका दांपत्याच्या बाळाची आई होणार आहे. कोरोनामुळे काम-धंदे बंद पडू लागल्याने नोकऱ्या गमावण्याची वेळ आली. यामुळेच नाईलाजास्तव महिला आपले गर्भाशय भाड्याने देऊ लागल्या आहेत. गुजरातमध्ये अशी २०-२५ प्रकरणे समोर आली आहेत.

संसाराचा गाडा हाकण्यासाठी महिलांनी हा मार्ग अवलंबला आहे. हैराण करणारी गोष्ट अशी आहे की, यात काही अविवाहित महिलांचाही समावेश आहे. याच्या मोबदल्यात त्यांना ३ ते ४ लाख रुपये आणि वैद्यकीय खर्च मिळतो आहे. जाणून घ्या त्यांची आपबीती…

[read_also content=”१ जूनपासून बदलणार ६ नियम, सामान्य माणसाच्या खिशावर कसा होणार परिणाम?; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/latest-news/lpg-cylinder-price-flight-fare-6-rules-pf-small-saving-interest-rates-will-change-from-1-june-2021-nrvb-135864.html”]

वडिलांनी आईला आणि मला सोडून दिलं; नोकरी गेल्यानंतर, हाच पर्याय होता

माझं नाव रिमा आहे. वय २३ वर्ष आहे. अजून हातही पिवळे झाले नाहीत. वडिलांनी मला आणि आईला सोडून दिलं आणि दुसरा संसार थाटला. आम्ही भाड्याच्या घरात राहतो. लोकांची घरकामे करुन आईने मला वाढवलं. मी देखील नोकरी करुन हातभार लावण्याचा प्रयत्न करत होते. कोरोना महामारीमुळे माझी नोकरी गेली. आईचं कामही बंद झालं. पैशांची आवक थांबली. घरभाड्याचा बोजा दिवसेंदिवस वाढत होता. घरमालकही वारंवार याची विचारणा करुन दबाव वाढवू लागला होता, म्हणून मग सरोगेट मदर होण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांच्या माध्यमातून संतती सुखासाठी इच्छुक असलेल्या दांपत्याशी संपर्क साधला. त्यांनी काही पैसेही दिले आहेत.

[read_also content=”त्याने सेक्स डॉलसोबत केला विवाह; आता या बॉडीबिल्डरच्या आयुष्यात येणार आहे अशी व्यक्ती की वाचल्यानंतर तुम्हीही व्यक्त कराल आश्चर्य https://www.navarashtra.com/latest-news/bodybuilder-who-is-in-threesome-with-2-sex-dolls-wants-to-introduce-male-doll-in-relationship-nrvb-135850.html”]

नोकरी गेली, डबे पुरवण्याचे काम सुरू केलं, तेही बंद झालं

ॲडव्होकेट अशोक परमार सांगतात, त्यांच्या परिचयातील एक राजश्री यांच्या पतीचे निधन झाले. आवक पूर्णपणे थांबली. मुलांसाठी त्यांना ही नोकरी करावी लागली. पण नोकरीही सोडावी लागली. त्यानंतर डबे पुरवण्याचं काम सुरू केलं. लॉकडाऊनमुळे तेही बंद झालं. तेव्हा एका महिलेने तिला सरोगेट मदर होण्याचा प्रस्ताव दिला. मुलांच्या भविष्याचा विचार करता राजश्रीने हा प्रस्ताव स्वीकारला. तथापि, यातून त्यांना घरखर्चासाठी आवश्यक असणारे पैसेही मिळाले. उरलेले पैसे प्रसुती झाल्यावर मिळणार आहेत.

पतीची नोकरी गेली, घरातली प्रत्येक वस्तू विकावी लागली

आमदार जी. एस. सोलंकी म्हणतात, रेखा नावाच्या महिलेच्या पतीची नोकरी कोरोना महामारी आल्यानंतर काही दिवसांनी गेली. त्यांना घरखर्च भागवण्यातही अनेक अडचणींचा सामाना करावा लागत होता. घरखर्चासाठी घरातल्या सर्व वस्तू विकाव्या लागल्या. उधार मागूनही पैसे मिळतच नव्हते. पण वस्तू विकूनही फार दिवस गुजराण करणं शक्य नव्हतं. तेव्हा रेखाने तिच्या पतीसमोर गर्भाशय भाड्याने देण्याचा पर्याय ठेवला. काहीच मार्ग दिसत नसल्याने पतीनेही रेखाला सरोगेट मदर होण्याची परवानगी दिली.

(सर्व महिलांची नावे बदलली आहेत.)

due to corona women troubled by financial crisis they are becoming surrogate mothers unmarried women also hire womb

Web Title: Due to corona women troubled by financial crisis they are becoming surrogate mothers unmarried women also hire womb nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2021 | 11:58 AM

Topics:  

  • financial crisis
  • महिला

संबंधित बातम्या

एसटीच्या आर्थिक संकटात वाढ; दरवाढीनंतर उत्पन्नात घट, पाच दिवसांत ‘इतक्या’ कोटींचे नुकसान
1

एसटीच्या आर्थिक संकटात वाढ; दरवाढीनंतर उत्पन्नात घट, पाच दिवसांत ‘इतक्या’ कोटींचे नुकसान

एका दिवसात भरमसाट नफा कमवायचाय? 12 ऑगस्टला ‘या’ Defence Share वर लक्ष ठेवा, 3 वर्षात दिलाय 311 टक्के रिटर्न
2

एका दिवसात भरमसाट नफा कमवायचाय? 12 ऑगस्टला ‘या’ Defence Share वर लक्ष ठेवा, 3 वर्षात दिलाय 311 टक्के रिटर्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.