Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पूर्व पीसीएमटीतील सव्वाशे कर्मचारी महापालिकेत होणार ‘पर्मनंट’

पूर्व पीसीएमटीमधील सव्वाशे कर्मचाऱ्यांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कायम करण्यात गुरुवारी पीएमीएमएलच्या पुण्यात झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

  • By Navarashtra News Network
Updated On: Sep 02, 2021 | 06:46 PM
पूर्व पीसीएमटीतील सव्वाशे कर्मचारी महापालिकेत होणार ‘पर्मनंट’
Follow Us
Follow Us:

पिंपरी : पूर्व पीसीएमटीमधील सव्वाशे कर्मचाऱ्यांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कायम करण्यात गुरुवारी पीएमीएमएलच्या पुण्यात झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पूर्व पीसीएमटीतील कार्यशाळेमधील चतुर्थश्रेणी कर्मचारी व चालक पदावरील काही कर्मचारी असे एकूण सव्वाशे कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सेवा करीत होते. या कर्मचाऱ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कायम करावे असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी दिली.

मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मासिक सर्वसाधारण सभेत देखील यास यापूर्वीच मंजुरी देण्यात आली होती. गुरुवारी पुणे येथे झालेल्या पीएमपीएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर माई ढोरे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडचे आयुक्त राजेश पाटील, पुण्याचे आयुक्त विक्रम कुमार, पुणे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि पुणे मनपाचे नगरसेवक व संचालक प्रकाश ढोरे, पीएमीएमएलचे महाव्यवस्थापक लक्ष्मीनारायण मिश्रा आदी उपस्थित होते.

या कर्मचाऱ्यांचे वेतन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पीएमपीएलला दरमहा संचलन तूट म्हणून काही कोटी रुपये देत असते. यातून दिले जावे, अशीही उपसूचना याबैठकीत करण्यात आली, अशी माहिती पिंपरी-चिंचवड मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अखत्यारीत असणारी पीसीएमटी आणि पिंपरी, पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत असणारी पीएमटी या दोन्ही परिवहन संस्थांचे 15 डिसेंबर 2007 ला पुणे महानगर परिवहन महामंडळात (पीएमपीएमएल) मध्ये विलिनीकरण करण्यात आले. यानंतर पीएमपीची संचलन तूट म्हणून पुणे महापालिका 60 टक्के आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका 40 टक्के याप्रमाणे रक्कम देतात. त्यामुळे या सव्वाशे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी वेगळी तरतूद करावी लागणार नाही.

Web Title: East pcmt employees to be permanent in pcmc nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2021 | 06:46 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.