बार्शी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बार्शी-कुर्डूवाडी रस्त्यावरील अलीपूर गावानजीक रात्री तीन वाहनांच्या अपघातात (Accident in Barshi) तिघे जण गंभीर जखमी झाले. यात एका दुचाकीसह दोन मोठ्या वाहनाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. कुर्डूवाडीच्या दिशेने निघालेल्या दुचाकीस्वारासही स्कॉर्पिओने धडक दिल्याने दुचाकीस्वार ही गंभीर जखमी झाला.
बार्शीकडून एर्टिगा गाडी कुर्डूवाडीकडे तर स्कॉर्पिओ गाडी कुर्डूवाडीहून बार्शीकडे येत होती. त्यावेळी दोन्ही वाहनाची समोरासमोर जोराची धडक बसली. या अपघातात इक्बाल शेख (रा. अकुलगाव ता. माढा), आयुब काशीम महाजन (रा. म्हैसगाव, माढा), हनुमंत जाधव (रा. गवळेवाडी, माढा), सुनीता जाधव, निकिता जाधव, अभिजित जाधव (सर्व रा. कुर्डूवाडी), मंगेश माने (रा. अलीपूर रोड, बार्शी) आणि आप्पा भगवान देठे हे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बार्शी शहर पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.