Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! बैल विकून आलेले पैसे न दिल्याने बाप-लेकात वाद; काठीने मारहाण करून बापाची हत्या

पोलिस पाटील राहुल लोखंडे यांनी याबाबत तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रावण सोपान खुरंगुळे यांनी बाजारात बैल विकले होते. त्याचे आलेले पैसे मुलगा अनंतराव याने मागितले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 09, 2025 | 11:46 AM
धक्कादायक ! बैल विकून आलेले पैसे न दिल्याने बाप-लेकात वाद; काठीने मारहाण करून बापाची हत्या

धक्कादायक ! बैल विकून आलेले पैसे न दिल्याने बाप-लेकात वाद; काठीने मारहाण करून बापाची हत्या

Follow Us
Follow Us:

बार्शी : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच बार्शीत मुलाने वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बैल विकून आलेले पैसे न दिल्याच्या कारणावरून चिडून मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याचा खून केला.

रावण सोपान खुरंगुळे (वय ७०, रा. वाणेवाडी) असे खून झालेल्या वृद्ध पित्याचे नाव आहे. अनंतराव उर्फ अनिल रावण खुरंगुळे असे खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिस पाटील राहुल लोखंडे यांनी याबाबत तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रावण सोपान खुरंगुळे यांनी बाजारात बैल विकले होते. त्याचे आलेले पैसे मुलगा अनंतराव याने मागितले. पण, पैसे न दिल्याने अनंतराव वडील रावण खुरंगुळे यांना रात्री काठीने व पोतराजाच्या वाकीने मारहाण केली होती. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, याबाबत तालुका पोलिस ठाण्यात मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत घोळवे करत आहेत. या अशा घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काठीने बेदम मारहाण

काठीने व पोतराजाच्या वाकीने बेदम मारहाण करून खून केला. तालुक्यातील वानेवाडी येथे रविवारी आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी उघडकीस ही घटना आली. घटनास्थळाची सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी पाहणी केली.

चारित्र्याच्या संशयावरून वारंवार मारहाण

दुसऱ्या एका घटनेत, चारित्र्याच्या संशयावरून वारंवार मारहाण करणार्‍या पतीचा पत्नीने डोक्यात व शरीरावर ठिकठिकाणी मारहाण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल एक वर्षानंतर याप्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रुग्णालयाकडून अंतिम अहवाल आल्यानंतर हा गुन्हा नोंदवल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अभिषेक अजेंट (वय २३, रा. साहिल हाईटस, चिंधेनगर, जांभुळवाडी) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी पत्नी वृषाली अजेंटराव (वय 24, रा. साहील हाईटस, जांभुळवाडी, आंबेगाव खुर्द) हिला अटक केली आहे.

Web Title: A man killed his father due to money issue incident in barshi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 11:46 AM

Topics:  

  • Barshi
  • crime news
  • Solapur News

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.