Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी संगीत विश्वात पहिल्यांदाच कवितेतून साकारलं गाणं, सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरलं!

प्रेम, मैत्री, माणुसकी यावर भाष्य करणार साईरत्न एंटरटेन्मेंटचं प्रेमकवी अपूर्व राजपूत यांनी लिहीलेल्या कवितेतून साकारलेलं "एक चांदण्याची रात" हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 15, 2025 | 06:35 PM
मराठी संगीत विश्वात पहिल्यांदाच कवितेतून साकारलं गाणं, सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरलं!

मराठी संगीत विश्वात पहिल्यांदाच कवितेतून साकारलं गाणं, सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरलं!

Follow Us
Close
Follow Us:

प्रेम, मैत्री, माणुसकी यावर भाष्य करणार साईरत्न एंटरटेन्मेंटचं प्रेमकवी अपूर्व राजपूत यांनी लिहीलेल्या कवितेतून साकारलेलं “एक चांदण्याची रात” हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात शहरी आणि ग्रामीण भागातून असणाऱ्या अनोळखी माणसांसोबत घालवलेल्या निःशब्द प्रेमाची जाणीव करून देणार आणि हृदयस्पर्शी संगीत अनुभव देणार आहे.

गाण्यात विशाल राऊत, विपुल धवन, दिपिका, वैष्णवी सांगळे, गायत्री नेरपगारे, शिवा मिरजकर, संकेत पगारे, विनायक पाटील, सौरभ अहिर, अंजली सिंग हे प्रमुख कलाकार आहेत. या गाण्याचे निर्माते सुरेश गाडेकर आणि संदेश गाडेकर हे आहेत. तर या गाण्याचे बोल प्रेमकवी अपूर्व राजपूत यांनी लिहिले आहेत. मनीष महाजन याच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्याला प्रज्वल यादव याने संगीत दिलं आहे. तर गायक जयदीप वैद्य आणि गायिका शीतल गद्रे यांनी हे गाणं गायल आहे.

साध्या सोज्वळ प्राजक्ता माळीची आगामी चित्रपटात हटके भूमिका, चित्रपटाच्या सेटवरील फोटो व्हायरल

कवी आणि गीतकार अपूर्व राजपूत ‘एक चांदण्याची रात’ या गाण्याच्या प्रोसेस विषयी सांगतो, “प्रेमकवी असल्यामुळे प्रेमातल्या विविध भावना वेगळ्या शब्दात मांडायला मला आवडतात. मी ग्रामीण भागातला आहे त्यामुळे या गाण्याचा बाज थोडा तसाच ठेवला आहे. चंद्र पांढरा पांढरा त्याला नाही तुझी सर, तुझा चेहरा सावळा त्यात तिळाची गं भर अशा अनुषंगाने काही प्रतिकं मला यात वापरता आली. आम्ही मित्र मिळून अक्षर तुझे आहे नावाचा कवितांचा कार्यक्रम करतो. त्यात स्वताच्या कविता कंपोज करून  सादर करत असतो.

माझा मित्र सारंग पंपटवार याने या कवितेला चाल दिली आहे. आम्ही कार्यक्रमाचा शेवट या गाण्याने करायचो. लोकांना या कवितेचं सादरीकरण फार आवडायचं. साईरत्न एंटरटेन्मेंटचे निर्माते सुरेश गाडेकर यांना ही चाल लावलेली कविता आवडली. आणि त्यांनी मला सांगितलं आपण या कवितेचं रूपांतर गाण्यात करूया. माझ्या कवितेचं गाणं झालं याचा मला फार आनंद झाला आहे. सध्या या गाण्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद देखिल मिळत आहे.”

या गाण्याचे निर्माते सुरेश गाडेकर गाण्याच्या चित्रीकरणाविषयी सांगतात, “एक चांदण्याची रात ही कविता ऐकताच क्षणी माझ्या मनाला भावली आणि म्हणून मी अपूर्व राजपूत यांना याच सुंदर गाणं करूया अस सांगितल. या गाण्याच चित्रीकरण आम्ही नाशिकच्या जंगलात रात्रीच्या वेळेस केल आहे. या गाण्याच चित्रीकरण एकाच रात्री करण्यात आल. पण संपूर्ण टीमने हे गाण सुंदररित्या शूट केलं. आणि सोशल मीडियावर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. माझी प्रेक्षकांना विनंती आहे की साईरत्न एंटरटेन्मेंटच्या सर्वच गाण्यांवर तुमच प्रेम असंच असू द्या.”

मधुर संगीत, सुंदर कथा आणि लाजवाब लोकेशन्सच्या माध्यमातून एक चांदण्यांची रात हे गाणं फुलल आहे. प्रेमाच्या दुनियेत हरवण्यासाठी हे गाण नक्की बघा !

अभिनयानंतर शरद पोंक्षे नव्या भूमिकेत, मुलगा स्नेह पोंक्षेसोबत घेऊन येणार चित्रपट; रिलीज डेट जाहीर

Web Title: Ek chandanyachi rat first marathi song base on poet released on social media see song

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2025 | 06:35 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • News Song

संबंधित बातम्या

‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सुरु केला नवा व्यवसाय;  रेस्टॉरंटचा फोटो शेअर करत म्हणाली आयुष्यात पुढचं पाऊल….
1

‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सुरु केला नवा व्यवसाय; रेस्टॉरंटचा फोटो शेअर करत म्हणाली आयुष्यात पुढचं पाऊल….

‘हुकुमाची राणी ही’ मालिका रंजक वळणावर, अखेर राणी-इंद्रा झाले सात जन्माचे सोबती
2

‘हुकुमाची राणी ही’ मालिका रंजक वळणावर, अखेर राणी-इंद्रा झाले सात जन्माचे सोबती

अमेय खोपकरच्या लेकाचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण, ‘येरे येरे पैसा ३’ मधलं ‘उडत गेला सोन्या’ थेट हृदयाला भिडणारं गाणं प्रदर्शित
3

अमेय खोपकरच्या लेकाचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण, ‘येरे येरे पैसा ३’ मधलं ‘उडत गेला सोन्या’ थेट हृदयाला भिडणारं गाणं प्रदर्शित

प्रेक्षकांच्या गुलाबी मनाला भावनारं “गुलाबी ऋतू” गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाण्याची जोरदार चर्चा
4

प्रेक्षकांच्या गुलाबी मनाला भावनारं “गुलाबी ऋतू” गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाण्याची जोरदार चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.