Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Chaturthi 2024: मंदिर उभारण्यासाठी बाप्पा स्वतः पृथ्वीवर अवतरले? गणेशाच्या अनोख्या मंदिराविषयी जाणून घ्या

देशात गणेशोत्सवाचे वारे वाहत असून आता अनेकांना बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागून राहिली आहे. याच पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला उज्जैनमधील एका प्रसिद्ध मंदिराविषयी सविस्तर माहिती सांगत आहोत. हे मंदिर बांधण्यासाठी स्वतः गणपती धर्तीवर अवतरल्याचे सांगितले जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 03, 2024 | 10:45 AM
Ganesh Chaturthi 2024: मंदिर उभारण्यासाठी बाप्पा स्वतः पृथ्वीवर अवतरले? गणेशाच्या अनोख्या मंदिराविषयी जाणून घ्या

Ganesh Chaturthi 2024: मंदिर उभारण्यासाठी बाप्पा स्वतः पृथ्वीवर अवतरले? गणेशाच्या अनोख्या मंदिराविषयी जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

यावर्षीचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सध्या सर्वत्र गणेशाच्या आगमनाची तयारी सुरु झाली आहे. हिंदू धर्मातील हा एक पवित्र सण आहे जो दरवर्षी श्रवणानंतर मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गणेशाच्या आगमनाने जणू ही सर्व सृष्टी बहरून येते. या दिवसांत लोक बाप्पाची मनोभावनेने पूजा करतात आणि त्याचा पाहुणचार करतात. तसेच अनेकलोक या दिवसांत देशातील काही गणेश मंदिरांना भेट देतात आणि गणेशाचे दर्शन घेतात.

देशात गेणेशाचे अनेक सुप्रसिद्ध मंदिर आहेत. प्रत्येक मंदिराची आपली अशी पौराणिक कथा आणि महत्त्व आहे. आज आम्ही तुम्हाला मध्य प्रदेशातील उज्जैन येथील एका सुप्रसिद्ध मंदिराविषयी काही अनोख्या गोष्टी सांगणार आहोत. हे मंदिर भारतातील प्रसिद्ध गणेश मंदिरांपैकी एक मानले जाते. या मंदिराचे नाव आहे चिंतामण गणेश (Chintaman Ganpati) मंदिर. आज आम्ही तुम्हाला या मंदिराविषयीच्या काही रंजक गोष्टी आणि त्याचा इतिहास उलगडून सांगणार आहोत.

हेदेखील वाचा – सम्राट आणि राणीच्या स्मरणार्थ बांधला गेला ‘गेटवे ऑफ इंडिया’, अनोखा इतिहास माहिती आहे का? जाणून घ्या

मंदिर फार जुने आहे

चिंतामण मंदिराचा इतिहास फार जुना आणि रंजक आहे. या मंदिराच्य्या इतिहासाबाबत बोलायचे म्हटले तर हे मंदिर अवघे शंभर वर्षाहून जुने मंदिर आहे. हे पवित्र मंदिर 11व्या आणि 12व्या शतकाच्या आसपास परमार शासकांनी बांधले होते असे सांगितले जाते. त्यामुळे हे मंदिर स्थानिक शहरासाठी तसेच संपूर्ण मध्यप्रदेशासाठी खूप खास मंदिर मानले जाते.

चिंतामण मंदिराची पौराणिक कथा

अनेक भाविकांद्वारे चिंतामण मंदिराची पौराणिक कथा सांगितली जाते. या पवित्र मंदिराबाबत भाविकांच्या दोन श्रद्धा आहेत.

पहिली – असे म्हटले जाते की, या पवित्र मंदिराच्या उभारणीसाठी भगवान गणेश स्वतः पृथ्वीवर अवतरले होते
दुसरी श्रद्धा- धार्मिक मान्यतेनुसार, चिंतामण गणेश मंदिराची स्थापना भगवान रामाने केली होती. लोककथेनुसार या मंदिराची स्थापना प्रभू रामाने वनवासात केली होती

हेदेखील वाचा – दोन राज्यात विभागले गेले आहे भारताचे हे रेल्वे स्टेशन, अमिताभ बच्चनच्या KBC मध्ये झाला खुलासा, वाचा सविस्तर

दर्शन वेळ आणि शुल्क

तुम्ही तुमच्या कुटुंबासह किंवा मित्रमैत्रिणींसह चिंतामणी मंदिराला भेट द्यायला जाऊ शकता. येथे एक महाकाल मंदिरदेखील आहे. या महाकाल देवस्थानपासून 20 मिनिटांच्या अंतरावर आहे.चिंतामण मंदिर. हे मंदिर सकाळी 8.00 ते रात्री 8.00 पर्यंत खुले असते. तसेच येथे दर्शनासाठी कोणतेही शुल्क आकारले
जात नाही.

चिंतामणी मंदिराला कसे जायचे

तुम्ही रेल्वे, हवाई तसेच रस्ता अशा तीनही मार्गांनी या मंदिराला भेट देऊ शकता.

रेल्वे – तुम्ही जर रेल्वेने जाण्याचा विचार करत असाल तर उज्जैन जंक्शन रेल्वे स्टेशन चिंतामण गणेश मंदिराजवळ आहे. उज्जैन रेल्वे स्टेशनपासून तुम्ही टॅक्सी, कॅब किंवा ऑटोने मंदिरापर्यंत सहज पोहचू शकता. हे मंदिर रेल्वे स्टेशनपासून सात किमी अंतरावर आहे.

हवाई – चिंतामणी गणेश मंदिराच्या सर्वात जवळचे विमानतळ अहिल्याबाई होळकर विमानतळ आहे. विमानतळापासून मंदिराचे अंतर सुमारे 58 किमी आहे. तुम्ही विमानतळावरून टॅक्सी, कॅब किंवा ऑटोने सहज जाऊ शकता.

रस्ता – तुम्ही रस्त्याचा प्रवास करत तुमच्या गाडीने जाण्याचा विचार करत असाल तर देशाच्या कोणत्याही भागातून तुम्ही उज्जैनला पोहचू शकता.

Web Title: Ganesh chaturthi 2024 read about the unique temple of ganesha they say that bappa himself descended to earth to build a temple

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 10:44 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganpati festival 2024
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या प्रसादासाठी घरी नक्की बनवा तोंडात टाकताच विरघळणारे बेसनाचे लाडू; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी
1

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या प्रसादासाठी घरी नक्की बनवा तोंडात टाकताच विरघळणारे बेसनाचे लाडू; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी

Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरी बनवा वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत मोदक
2

Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरी बनवा वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत मोदक

गौरी गणपतीच्या सणासाठी खरेदी करा ‘या’ डिझाईनच्या ठुशी, पारंपरिक दागिन्यांनी वाढेल सणांची शोभा
3

गौरी गणपतीच्या सणासाठी खरेदी करा ‘या’ डिझाईनच्या ठुशी, पारंपरिक दागिन्यांनी वाढेल सणांची शोभा

यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घरीच बनवा केशरी बुंदीचे लाडू, विकतची मिठाई कायमची जाल विसरून
4

यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घरीच बनवा केशरी बुंदीचे लाडू, विकतची मिठाई कायमची जाल विसरून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.