Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गंगुबाई काठियावाड़ी’ पुन्हा वादात,आता चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेत दोन याचिका दाखल

या चित्रपटातील दक्षिण मुंबईतील `कामाठीपुरा’ या परिसराचा संदर्भ काढून टाकण्याची मागणी करत या परिसरातील ५५ स्थानिक रहिवाश्यांच्यावतीने श्रद्धा सुर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.

  • By Smita Manjrekar
Updated On: Mar 14, 2022 | 03:45 PM
गंगुबाई काठियावाड़ी’ पुन्हा वादात,आता चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेत दोन याचिका दाखल
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: निर्माता आणि दिग्दर्शक संजयलीला भंसाली यांच्या ‘गंगूबाई काठियावाड़ी’ चित्रपटामागे लागलेले शुक्लकाष्ठ संपता संपत नाही आहे. अवघ्या काही दिवसांवर चित्रपट प्रदर्शित होणार असताना आता पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेत त्याविरोधात दोन याचिका दाखल करण्यात आल्या असून त्यावर बुधवारी तातडीने सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.

आलिया भट्ट अभिनीत ‘गंगूबाई काठियावाड़ी’ या चित्रपटातील दक्षिण मुंबईतील `कामाठीपुरा’ या परिसराचा संदर्भ काढून टाकण्याची मागणी करत या परिसरातील ५५ स्थानिक रहिवाश्यांच्यावतीने श्रद्धा सुर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील दृश्यांवरून कामाठीपुरा परिसराची प्रतिष्ठा मलिन होत आहे. चित्रपटाने संपूर्ण परिसर रेड-लाइट हब म्हणून चित्रित करून त्या परिसराला अपमानास्पद वागणूक देण्यात आली आहे. येथील रहिवाशांची, विशेषतः महिलांची प्रतिमा मलीन होण्याची भीती आहे, त्यामुळे यातील कामाठिपुरा हा शब्द वगळावा आणि अन्य, तत्सम शब्द वापरावा, अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे. त्यावर बुधवारी न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार आहे.

दुसरीकडे, काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनीही उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या परिसरातील अनेक सामाजिक संस्थाकडून या चित्रपटावर आक्षेप नोंदविण्यात आला आहे. तसेच कामाठीपुरा हा रेड-लाईट परिसर सांगण्यात आले असून गंगुबाई एक वैश्या आणि माफीया क्विन असल्याचे आणि संपूर्ण परिसर रेड-लाईट असल्याचे चित्रित करण्यात आल्यावर संस्थांनी आक्षेप घेतला असल्याचेही आमदारांचे म्हणणे आहे. त्यावरही बुधवारी मुख्य न्यायमूर्तीसमोर सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. आलिया भट आणि अजय देवगण यांची मुख्य भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावाड़ी’ येत्या २५ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

Web Title: Gangubai kathiawadi controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2022 | 08:52 PM

Topics:  

  • aalia bhatt
  • Gangubai Kathiawadi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.