Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी पाससाठी, ‘या’ आशयाचे स्टीकर्स उपलब्ध केले जाणार

गुरुवार दि. ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. पाससाठी विशिष्ट आशयाचे स्टीकर्स उपलब्ध केले जाणार आहेत. . मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर ही टोल माफी असणार आहे.

  • By नारायण परब
Updated On: Sep 04, 2024 | 09:39 PM
'देशात टोलनाके राहणार नाहीत, सरकार आता...'; केंद्रीयमंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा

'देशात टोलनाके राहणार नाहीत, सरकार आता...'; केंद्रीयमंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा

Follow Us
Close
Follow Us:

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना गुरुवार दि. ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे.

गणेशोत्सव हा सण कोकणातील सर्वात मोठा सण आहे.  संपूर्ण कोकणामध्ये गणेशोत्सवाचा वातावरण हे वेगळेच असते. लाखोंच्या संख्येने मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई,  पुणे शहरातील कोकणवासीय चाकरमानी गणेशोत्सवासाठी जातात. कुंटुंबासह हा सण साजरा करतात. त्या चाकरमान्यांचा विचार करत राज्य सरकारने घेतलेला टोल माफीचा निर्णय महत्वाचा आहे.

हे देखील वाचा- मोठी बातमी! अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे; पगारात ६,५०० रूपयांची वाढ

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दि.१४ ऑगस्ट रोजी झालेल्या गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते, त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाने पथकर सवलतीचा शासन निर्णय जारी केला आहे.

‘गणेशोत्सव २०२४, कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स

या टोलमाफी सवलतीसाठी ‘गणेशोत्सव २०२४, कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल.

तसेच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना ही टोल माफी लागू असणार आहे. गणेशोत्सवासाठी ज्या जिल्ह्यातून बसेस येथील त्या ठिकाणच्या पोलीस किंवा आरटीओ यांच्याकडून हे पास एसटी महामंडळाला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या देखील सूचना आहेत.

Web Title: Government decision to waive toll for ganesha devotees going to konkan announced stickers of will be made available

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 09:34 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • kokan

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi 2025: माथेरानमध्ये भक्तिमय वातावरणात माहेरवाशीण साजरा केला ओवसा
1

Ganesh Chaturthi 2025: माथेरानमध्ये भक्तिमय वातावरणात माहेरवाशीण साजरा केला ओवसा

Ganesh Chaturthi 2025 :  पिटुकला उंदीर बाप्पाचं वजन कसं पेलवतो? यामागे आहे एक रंजक गोष्ट
2

Ganesh Chaturthi 2025 : पिटुकला उंदीर बाप्पाचं वजन कसं पेलवतो? यामागे आहे एक रंजक गोष्ट

Ganesh Chaturthi: गणपतीच्या दिवसात घराची शोभा वाढवतील बेडशीट्स, Home Decor साठी अशी करा निवड
3

Ganesh Chaturthi: गणपतीच्या दिवसात घराची शोभा वाढवतील बेडशीट्स, Home Decor साठी अशी करा निवड

Photo : मुग्यांसारखी लोकांची गर्दी…! दगडूशेठ बाप्पाच्या चरणी भक्तांची रीघ,पहा खास फोटो
4

Photo : मुग्यांसारखी लोकांची गर्दी…! दगडूशेठ बाप्पाच्या चरणी भक्तांची रीघ,पहा खास फोटो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.