Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षक, ग्रामसेवक विना परवानगी जिल्हा परिषदेत आल्यास थेट निलंबनच करू; दिलीप स्वामींचा इशारा

विना परवानगी मुख्यालयात प्रवेश करणारे ग्रामसेवक, शिक्षक कारवाईच्या रडारवर आले आहेत. कार्यालयीन कामकाजवेळी मुख्यालयात जर महत्वपूर्ण काम असेल तर संबंधित विभागप्रमुखांच्या परवानगीचे पत्र आवश्यक आहे. विनापरवाना मुख्यालयात आल्यास थेट निलंबन करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 20, 2022 | 06:56 PM
शिक्षक, ग्रामसेवक विना परवानगी जिल्हा परिषदेत आल्यास थेट निलंबनच करू; दिलीप स्वामींचा इशारा
Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : विना परवानगी मुख्यालयात प्रवेश करणारे ग्रामसेवक, शिक्षक कारवाईच्या रडारवर आले आहेत. कार्यालयीन कामकाजवेळी मुख्यालयात जर महत्वपूर्ण काम असेल तर संबंधित विभागप्रमुखांच्या परवानगीचे पत्र आवश्यक आहे. विनापरवाना मुख्यालयात आल्यास थेट निलंबन करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Dilip Swami) यांनी दिला आहे.

जिल्हा परिषद मुख्यालयात शिक्षक, ग्रामसेवक यांच्यासह कर्मचाऱ्यांना विना परवानगी प्रवेश नाकारण्यात आला आहे. सध्या कोविड-१९ विषाणूचा प्रसार वेगाने वाढत असून रुग्णसंख्याही वाढत आहे. त्यामुळे पुढील काळात त्याचा प्रसार जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असतानाही काही शिक्षक, ग्रामसेवक व कर्मचारी हे जिल्हा परिषद मुख्यालयात कारण नसताना फिरताना दिसतात. तसेच इतर कालावधीत सुद्धा स्वतःचे कामकाज सोडून अनेक कर्मचारी व शिक्षक जिल्हा परिषद मुख्यालयात फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील कामावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच कोविड-19 वर नियंत्रण मिळविणेच्या दृष्टीने तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने आज प्रत्येक विभाग प्रमुखांना परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

या परिपत्रकानुसार शिक्षक, ग्रामसेवक, कर्मचारी यांनी मुख्यालय सोडताना आपल्या कार्यालय प्रमुखांची लेखी पूर्वपरवानगी घ्यावी. लेखी पूर्वपरवानगी नसल्यास संबंधितांना जि.प. मुख्यालयात प्रवेश नाकारण्यात येईल.

– जि.प. मुख्यालयात प्रवेश करतेवेळी कोविड-19 लसीकरणाचे प्रमाणपत्र बंधनकारक राहील.

– जि.प. मुख्यालयात प्रवेश केल्यानंतर ज्या विभागाकडे कामासंदर्भात जाणार आहात त्या विभागाच्या अभ्यागत भेट नोंदवहीमध्ये आपली नोंद करावी.

– जर एकही शिक्षक, ग्रामसेवक, कर्मचारी पूर्वपरवागीविना जिल्हा परिषद मुख्यालयात आढळल्यास त्यास संबंधित कार्यालय प्रमुख/मुख्याध्यापक/केंद्रप्रमुखांना जबाबदार धरून प्रथम त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्यात येईल व त्याचबरोबर संबंधितांवर देखील प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, अशी माहिती दिलीप स्वामी यांनी दिली.

Web Title: If teachers gram sevaks come to zilla parishad without permission we will suspend them directly says dilip swami in solapur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2022 | 06:55 PM

Topics:  

  • Dilip Swami
  • दिलीप स्वामी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.