देशभरात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी
दिल्ली नागरिकांना होतोय उकाड्याचा त्रास
मात्र काही राज्यात पावसाची शक्यता
IMD Heavy Rain Alert In India: देशभरात कालपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र भारतीय हवामान विभागाने आज अनेक राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. तर काही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र काही भागात नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. तर हवामान विभागाने राज्यांना पावसाचा कोणता अलर्ट दिला आहे, ते जाणून घेऊयात.
राजधानी दिल्लीत काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे यमुना नदीची पाणी पातळी देखील कमी होत आहे. मात्र पाऊस थांबल्याने लोकांना उकाड्याचा त्रास जाणवत आहे. पुढील काही दिवंत दिल्लीत पावसाची शक्यता कमी असल्याचे म्हटले जात आहे.
उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सहारनपूर, मुजफ्फरनगर, मोराडाबाद, यांसह अन्य काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. वीजांच्या कडकडटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये कसे असणार हवामान?
बिहारमध्ये देखील आज भारतीय हवामान विभगाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी वीज कोसळणे किंवा अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उत्तराखंड
भारताच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी ढगफूटी आणि अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. डेहराडून, रुद्रप्रयाग, चंपावत, पिठोरागड या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरडी कोसळणे, झाडे पडणे अशा घटना घडण्याची शक्यता आहे. नागरिकांना सावधान राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अन्य राज्ये
देशातील अन्य राज्ये ज्यात दक्षिण भारतातील आनंदहर प्रदेश, तामिळनाडू, केरळ या राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. पूर्वेकडील राज्ये, महाराष्ट्रातील विदर्भ, कोंकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा जोर वधू शकतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Heavy Rain Alert: पावसाचा ‘या’ राज्यांमध्ये कहर; IMD च्या इशाऱ्याने वाढली चिंता, उत्तराखंडमध्ये तर…
पूर्व आणि मध्य भारतातील बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, तर महाराष्ट्र, दक्षिण भारतात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रातील कोकण, मराठवाडा, पुणे भागात देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान हवामान विभागाने अनेक राज्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे.