उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०२२ निकाल थेट: विधानसभा निवडणुकीनंतर २३ दिवसांनी, उत्तराखंडमधील सर्व ७० विधानसभा जागांचे निकाल आज घोषित केले जातील. त्यामुळे यावेळी सत्तेची धुरा कोणत्या पक्षाच्या हाती येणार हेही स्पष्ट होणार आहे. त्यासाठीची मतमोजणी सुरू झाली आहे.
सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आता भाजपने बाजी मारली आहे. आता भाजप २९ जागांवर, काँग्रेस २८ जागांवर आणि इतर पक्ष २ जागांवर आघाडीवर आहेत.
वेगाने बदलणारे ट्रेंड
उत्तराखंडमध्ये झपाट्याने समीकरणे बदलत आहेत. येथे भाजप २९ जागांवर तर काँग्रेस २८ जागांवर पुढे आहे.
कांग्रेस-भाजपा मध्ये काट्याची टक्कर
सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपची काँग्रेसशी निकराची लढत दिसून येत आहे.