
IND W vs SA W Final Match: Chak De India! Indian Women created history; won the ODI World Cup by defeating South Africa
Indian Women Win ODI World Cup 2025 by Defeating South Africa : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा अंतिम सामना भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिका संघाला धावांनी पराभूत करत विश्वचषकाचे जेतेपद जिंकले आहे. या जेतेपदासह भारतीय महिला संघाने इतिहास रचला आहे.नाणेफेक गमावणाऱ्या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर २९९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. दक्षिण आफ्रिकेचा संघ लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वबाद २४६ धावांचा करू शकला. परिणामी भारताने सामना ५२ धावांनी जिंकला आणि ऐतिहासिक असे जेतेपद आपल्या नावे केले. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.
भारतीय संघाने दिलेल्या २९९ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने दमदार सुरुवात केली होती. कर्णधार लॉरा वोल्वार्ड आणि ताजमिन ब्रिट्स या सलामीवीर जोडीने पहिल्या विकेट्ससाठी ५१ धावांची भागीदारी रचली होती. त्यानंतर ताजमिन ब्रिट्स 23 धावा करून बाद झाली. अमनजोर कौरने धावबाद केले. त्यानंतर मैदानात आलेली अॅनेके बॉश भोपळा ही न फोडता माघारी गेली. तिला श्री चरणीने बाद केले. सुन लुस आणि लॉरा वोल्वार्ड यांनी संघाला सावरले पण सून लुस ला शेफाली वर्माने बाद केले. त्यानंतर मारिझान कॅप ४ धावा, सिनालो जाफ्ता १६ धावा, अनेरी डेर्कसेन ३५ धावा करून बाद झाली. या दरम्यान कर्णधार वोल्वार्डने एक बाजु सांभाळून धरली आणि शतक झळकवले. परंतु, ती १०१ धावा करून दिप्तीची शिकार ठरली. त्यानंतरक्लो ट्रायॉन ९ , नादिन डी क्लर्क १८, अयाबोंगा खाका 1 धावा करून बाद झाल्या तर नॉनकुलुलेको म्लाबा ० धावावर नाबाद राहिली. भारताकडून दिप्ती शर्माने 9.3 ओव्हरमध्ये ३९ धावा देत सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तर शेफाली वर्माने २ विकेट्स घेतल्या आणि श्री चरणीने एक विकेट घेतली.
𝐂.𝐇.𝐀.𝐌.𝐏.𝐈.𝐎.𝐍.𝐒 🏆 Congratulations to #TeamIndia on winning their maiden ICC Women’s Cricket World Cup 🇮🇳 Take. A. Bow 🙌#WomenInBlue | #CWC25 | #Final | #INDvSA pic.twitter.com/rYIFjasxmc — BCCI Women (@BCCIWomen) November 2, 2025
शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, राधा यादव, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर.
लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), ताजमिन ब्रिट्स, अनेके बॉश, सुने लुस, मारिझान कॅप, सिनालो जाफ्ता (यष्टीरक्षक), अनेरी डेर्कसेन, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा.